कोल्हापूर ता.18 : महानगरपालिका मालकीचा इस्टेट विभागाकडील रमणमळा जलतरण तलाव हा सकाळी 6 ते 10 व दुपारी 2 ते 6 या कालावधीत सुरु असतो परंतू सध्या उन्हाळी सुट्टी असलेने व महापालकेच्या मालकीचा अंबाई जलतरण तलाव दुरुस्तीसाठी बंद असलेने नागरीकांना पोहण्यासाठी सोय उपलब्ध व्हावी म्हणून महानगरपालिकेमार्फत मे महिना कालावधीत रमणमळा जलतरण तलाव दिवसभर म्हणजे सकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत सुरु राहणार आहे. तरी नागरिकांनी याचा लाभा घ्यावा असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात येत आहे.