सांगली :भारतातील आघाडीचा डी२ सी सौंदर्य आणि निरोगीपणाचा ब्रँड वॉव (WOW) स्किन सायन्सने बॉलीवूड स्टार भूमी पेडणेकरसह आपली नवीनतम टीव्ही जाहिरात मोहीम सुरू केली आहे. यात ‘बदल’ या विषयावर भर देत, लोकांकडून वा तेजस्वी सूर्य किंवा धूळ यांसारख्या निसर्गातील घटकांकडून कुठल्याही नकारात्मकतेमुळे आपल्यात बदल का होता कामा नये आणि आपली आंतरिक चमक जाता कामा नये, यावर ह्या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आले आहे .
व्हिटॅमिन सी ने उपयुक्त असलेल्या ह्या फेस वॉशमध्ये कोणत्याही तीव्र स्वरूपाची रसायने वापरण्यात आलेली नाहीत. स्किन सायन्स व्हिटॅमिन सी फेस वॉशमध्ये सक्रिय व्हिटॅमिन सी, ऑरेंज आणि लिंबू इसेंशियल ऑईल्स, लिकोरिस आणि मलबेरी अर्क यांचा समावेश आहे. ते तुमच्या त्वचेचा पोत आणि दिसणे सुधारण्यास मदत करते. त्वचेला निस्तेजपणा आणणारे मुक्त रॅडिकल्स, वयाचे डाग आणि सुरकुत्या यांना आळा घालण्यास व्हिटॅमिन सी मदत करते. फेस वॉशमध्ये असलेले लिंबू आणि ऑरेंज इसेंशियल तेले रंग सुधारण्यास आणि त्वचेची चमक पुन्हा निर्माण करण्यात मदत करतात आणि लिकोरिस आणि मलबेरी अर्क काळे डाग कमी करण्यास आणि त्वचेचा टोन कमी करण्यासही मदत करतात. उल्लेखनीय म्हणजे, वॉव स्किन सायन्समधील फेसवॉश आणि सीरममध्ये पॅराबेन्स, सल्फेट्स, सिलिकॉन किंवा खनिज तेल नसतात.
या मोहिमेबाबत भूमी पेडणेकर म्हणाली की “मी आता जिथे आहे तिथे पोहोचण्यासाठी मी खूप टीका, अनाहूत सल्ला आणि आत्मशंका सहन केल्या आहेत – पण मला खात्री होती की मी माझी चमक कोणासाठीही कमी होऊ देणार नाही या मोहिमेचा एक भाग झाल्यामुळे मी रोमांचित आहे. केवळ मी सुरुवात केली तेव्हापासूनच ते माझ्याशी संबंधित आहे म्हणून नाही तर ते आज या जगात अशा अनेकांशी संबंधित आहे ज्यांना ते आतून किती तेजस्वी आहेत हे दाखवण्यासाठी अशा प्रोत्साहनाची गरज आहे.”
वॉव स्कीन सायन्सचे सह-संस्थापक मनीष चौधरी म्हणाले की आमचे व्हिटॅमिन सी फेस वॉश नेहमीच टिकाऊपणाचे ध्वजवाहक आणि हानिकारक रसायने व प्रदूषकांच्या विरोधात भूमिका बजावणारे आहे. वॉवमध्ये आम्ही तयार केलेल्या प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी आमचे ग्राहक असतात. भूमी पेडणेकर यांच्यासोबत समन्वय हा आमची दोन मूल्ये एकत्र करते जो आम्हाला आमच्या ग्राहकांशी जुळवून घेण्यास मदत करतो.”
