जत प्रतिनिधी: जत येथील शांताबाई शिवशंकर आरळी आयुर्वेद महाविद्यालय येथे बीएमएस प्रथम वर्षाकरिता असणारा ट्रांझीशनल करिकुलम ही 15 दिवसांची कार्यशाळा आज यशस्वीरित्या संपन्न झाली.
सदर कार्यक्रमाच्या समारंभाकरिता प्रसिद्ध युटुबर आणि आयुर्वेद वैद्य सुविनय दामले, कुडाळ यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. या निमित्ताने आयुर्वेद हेच खरे शास्त्र व खरी पॅथी असून आयुर्वेदाच्या सहाय्याने माणूस 100 वर्षे निरोगी जगू शकतो असे त्यांनी प्रतिपादित केले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वैद्य शिवकांत पाटील,आयुर्वेद व्यासपीठ जिल्हा कार्यकारणी सांगलीचे सचिव यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स इंग्लिश मीडियम इंटरनॅशनल स्कूलचे ऍडमिनिस्ट्रेटर श्री किट्टद आणि उमा नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य श्री माळी यांची उपस्थिती होती. आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर प्रदीप भोसले, उपप्राचार्य डॉक्टर धनंजय खोत आणि मेडिकल डायरेक्टर योगेश जिरांकलगीकर यांनी कार्यशालेत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल डॉ हृषिकेश सावंत यांचे प्राचार्यांनी विशेष अभिनंदन केले. सदर कार्यक्रमास उमा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध डॉक्टर रवींद्र आरळी यांचे मार्गदर्शन लागले.
