कोल्हापूर,: भारतातील अग्रगण्य खाद्य उत्पादकांपैकी एक वॉर्डविझार्ड फूडस् अँड बेव्हरेजेस लिमिटेड (डब्लूडब्लूएफएनबी) यंदाच्या आहार २०२३- आंतरराष्ट्रीय खाद्य आणि आदरातिथ्य मेळाव्याच्या ३७ व्या आवृत्तीचा भाग होण्यास उत्सुक आहे. हा कार्यक्रम १४ मार्च ला नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर सुरु झाला आसून तो १८ मार्च २०२३ पर्यंत असणार आहे.
आहार हा आशियातील बिटूबी कार्यक्रम आहे, जो इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनाइज़ेशन द्वारे आयोजित केला जातो. हा उपक्रम चालू झाल्यापासून खूप वेगाने वाढला आहे आणि आज तो जागतिक विक्रेते आणि सोर्सिंग व्यावसायिकांसाठी प्रसिद्ध व्यासपीठ म्हणून ओळखला जातो.
या कार्यक्रमामध्ये डब्लूडब्लूएफएनबी त्यांच्या दर्जेदार खाद्य उत्पादनांच्या विस्तृत श्रेणींचे प्रदर्शन करणार आहे- क्विकसेफ रेडी टू ईट जेवण, गोठवलेल्या (फ्रोझन) वस्तूंपासून ते स्नॅक बडी मसाले आणि पेयांपर्यंत. कंपनी दर्जेदार उत्पादन वितरित करण्यासाठी आणि उत्कृष्टतेची उच्च मानके राखण्यासाठी वचनबद्ध आहे.
या सहभागाबाबतच्या कंपनीच्या योजनांबाबत बोलताना वॉर्डविझार्ड फूडस् अँड बेव्हरेजेस लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालिका शीतल भालेराव म्हणाल्या की, या महत्त्वाच्या कार्यक्रमातील आमचा सहभाग हा आमच्या जागतिक उपस्थितीला अजून चालना देईल आणि आम्हाला खाद्य पदार्थ आणि पेये उद्योग क्षेत्रामधील सध्याच्या ट्रेंडबद्दल मौल्यवान माहिती मिळविण्यास मदत करेल. जगाच्या सर्व भागातील वितरकांशी संपर्क साधण्याचे आणि संभाव्य व्यावसायिक भागीदारांना भविष्यातील सहकार्यासाठी भेटण्याचे आमचे ध्येय आहे. या कार्यक्रमात भाग घेऊन आम्ही गुणवत्ता आणि नाविन्यपूर्णतेबाबत आमच्या वचनबद्धतेशी पूरक असणाऱ्या कंपन्यांबरोबर भागीदारी करण्यास उत्सुक आहोत.
