सावर्डे खुर्द, दि. २०: सावर्डे खुर्द ता. कागल गावाला पाणीपुरवठा करणारी बोरवेल तांत्रिक अडचणीमुळे बंद पडल्याने येथील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण थांबवण्यासाठी गेल्या चार दिवसापासून नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने नवीद मुश्रीफ यांच्या सूचनेने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
येथील बोरवेल नादुरुस्त झाल्यामुळे येथे पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता याबाबत सामाजिक कार्यकर्ते सागर मालवेकर यांनी गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ यांना सांगताच त्यांनी येथील ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेवून तात्काळ पिण्याचे पाण्याची टँकरची सोय लावून दिली. याबद्दल गावकऱ्यांच्यामधून समाधान व्यक्त होत आहे.
मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने यापूर्वीही कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदार संघातील अनेक गावांमध्ये शेकडो बोरवेल मारून वाड्या- वस्त्यांवरील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
यावेळी श्री सागर मालवेकर, पांडुरंग कदम, केरबा पसारे, भैरू डाफळे, सखाराम मोगणे, रणजीत मालवेकर, नामदेव मालवेकर, शामराव मालवेकर, श्री बाबुराव मालवेकर, संभाजी मालवेकर, श्री महादेव मालवेकर, प्रवीण मालवेकर, नामदेव खंडागळे, रंगराव कांबळे, संजू मालवेकर, विजय मालवेकर आदी उपस्थित होते.
