रोटरी क्लब ऑफ होरायझन तर्फे सामाजिक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले, निमित्त होते डिस्ट्रिक्ट ३१७० चे डिस्टिक गव्हर्नर रो व्यंकटेश देशपांडे यांच्या भेटीचे.
प्रत्येक व्यक्तीला समाजभान असावे, आपण समाजाचे काही देणे लागतो हे मनाशी ठरवून आपल्या आवडीच्या क्षेत्रांत समाजाची सेवा करावी. अशी सेवा करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून रोटरी तर्फेविविध सामाजिक पुरस्कार दिले जातात. त्यापैकी एक म्हणजे ‘वोकेशनल अवॉर्ड’. तर आदर्श समाज आणि उज्वल पिढी घडवण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे अशा आदर्श शिक्षकांना दिला जाणारा ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’.
‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ साठी विविध पातळीवरती निवड प्रक्रिया राबवली जाते. शिक्षकांसाठी हि कसोटी असते. शाळेचे मुख्याध्यापक, सह शिक्षक याचबरोबर शाळेचे विद्यार्थी देखील ‘आदर्श शिक्षक’ निवडण्याच्या प्रक्रियेत सहभागी असतात. यंदाचा पुरस्कार समाजातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्यामध्ये सर्वस्व ओतून, त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन अज्यांनी अनेक खेळाडूंना राष्ट्रीय व राज्य स्तरावर खेळण्याची संधी दिली असे आयर्विन ख्रिश्चन हायस्कुल, कोल्हापूर चे क्रीडा शिक्षक श्री. पौलस उर्फ पॉल सूर्यवंशी सर तसेच आंतर भारती शिक्षण मंडळाचे शा कृ पंत वालावलकर हायस्कुल चे क्रीडा शिक्षक- श्री. राजेंद्र बनसोडे (राष्ट्रीय प्रशिक्षक) यांना यावर्षीच्या ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२२-२३’ ने सन्मानित करण्यात आले.
सायकलिंगच्या डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग या अभ्यासक्रम पदवी परीक्षेत ‘देशात तिसरा क्रमांक’ मिळवून कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे एन. आय. एस सायकलिंग कोच अक्षय संदीप कारेकर, कोरोनाच्या दुसऱ्या गंभीर लाटेत शववाहिकेवर सारथ्य करणारी, मृतदेहांना अंत्यसंस्कार करणारी कु. प्रिया प्रकाश पाटील व गेली 37 वर्षे निस्वार्थी पणे प्राणी सेवा करणारे पांजरपोळ संस्थेचे डॉ. राजकुमार बागल यांना या प्रसंगी ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व्यंकटेश देशपांडे यांनी रोटरीच्या माध्यमातून जगभरामध्ये चाललेली समाजकार्ये विशेषतः ‘पोलिओ निर्मूलन’, शिक्षण क्षेत्रासाठी राबवल्या जाणारा ‘TEACH’ या उपक्रमाबाबत उपस्थितांना माहिती दिली. दानाचे महत्त्व त्यांनी विशद करताना त्यांनी अनेक उदाहरणे दिली तसेच रोटरी मध्ये जो दातृत्व भाव आहे यामुळेच रोटरी असे मोठे प्रकल्प राबवू शकते असेही नमूद केले. असिस्टंट गव्हर्नर रो. प्रवीण कुंभोजकर यांनी क्लबच्या प्रगती विषयी समाधान व्यक्त केले व पुढील वाटचालीसाठी क्लबला शुभेच्छा दिल्या.
मुख्य कार्यक्रमानंतर आपल्या विनोद बुद्धीने ज्यांनी अनेकांची मने जिंकली आहेत, झी मराठी हास्य सम्राट झी अवॉर्ड व चला हवा येऊ द्या फेम प्राध्यापक श्री अजित कुमार कोष्टी यांचा एकपात्री हास्य प्रयोगाचा आस्वाद उपस्थितांनी घेतला या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ होरायझन चे प्रेसिडेंट संजय साळोखे, सेक्रेटरी सागर बकरे यांच्यासोबत रोटरी क्लब चे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि कुटुंबीय उपस्थित मोठ्या संख्येने उपिस्थत होते.
