मुंबई : भारतातील पहिले आणि विश्वसनीय ओम्नी-चॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर व टाटा समूहातील एक ब्रँड क्रोमाने बहुप्रतीक्षित समर सेलची घोषणा केली आहे. यामध्ये क्रोमाच्या ग्राहकांना घरगुती वापराच्या उत्पादनांच्या विशाल श्रेणीवर अनेक आकर्षक ऑफर्सचा लाभ घेता येईल. यावर्षी उन्हाळा लवकर सुरु होण्याची शक्यता आहे, वाढत्या उष्म्यापासून संरक्षण करण्यात घर सुसज्ज करण्याची संधी या समर सेलमध्ये मिळणार आहे.
क्रोमाच्या समर सेलमध्ये एअर कंडिशनर्स, रूम कूलर्स, रेफ्रिजरेटर्स आणि इतर अनेक उत्पादनांवर ४५% पर्यंतची सूट मिळवता येईल. क्रोमामध्ये एअर कंडिशनर्सची विशाल श्रेणी उपलब्ध करवून देण्यात आली आहे. ३५० पेक्षा जास्त एसी, ४५० पेक्षा जास्त रेफ्रिजरेटर्समधून ग्राहक आपली आवड आणि गरज यानुसार उत्पादने निवडू शकतील,त्यासोबत एक्स्चेंज आणि अपग्रेडचे लाभ, कॅशबॅक ऑफर्स आणि १८ महिन्यांपर्यंतचे ईएमआयचे पर्याय देखील क्रोमामध्ये उपलब्ध आहेत.
क्रोमामध्ये स्प्लिट एसीच्या किमती फक्त २७९९० रुपयांपासून पुढे, रूम कूलर्सच्या किमती फक्त ५९९० पासून पुढे आणि क्रोमा फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर्सच्या किमती फक्त २१९९० रुपयांपासून पुढे आहेत. उन्हाळ्यापासून सुटका करून घेण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व उत्पादनांचा समावेश क्रोमाच्या समर सेलमध्ये करण्यात आला आहे. मोठा रेफ्रिजरेटर खरेदी करून अपग्रेड करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी याठिकाणी साईड-बाय-साईड ६३० लिटरचे कन्व्हर्टिबल रेफ्रिजरेटर्स आहेत, त्यांच्या किमती फक्त ६४९९० रुपयांपासून पुढे आहेत. आपल्या गरजांनुसार योग्य उत्पादने निवडण्यासाठी ग्राहक क्रोमाच्या कर्मचाऱ्यांकडून सल्ला मदत देखील मिळवू शकतात.
इतकेच नव्हे तर क्रोमाच्या समर सेलमध्ये ज्युसर मिक्सर ग्राइंडर, पंखे आणि इतर उपकरणांवर देखील अभूतपूर्व ऑफर्स दिल्या जात आहेत. उन्हाळ्यात देखील थंडाव्याचा आनंद मिळवता यावा यासाठी ग्राहकांना सर्वोत्तम डील्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे लाभ मिळवून देण्यात क्रोमाने काहीच कसूर ठेवलेली नाही.
क्रोमा स्टोर्स, क्रोमा डॉट कॉम किंवा टाटा नेउवर आपल्या आवडीची इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करा. आपल्या जुन्या उपकरणांना अपग्रेड करण्याची आणि सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा अनुभव मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. क्रोमाच्या आकर्षक डील्स व सूट योजनांचा लाभ घेऊन उन्हाळ्यात देखील थंडाव्याची मजा लुटा.
