add_action('wp_head', function(){echo '';}, 1);
वेतन करार वेळे अगोदर आणि प्रगतिशील पणे पूर्ण करण्याच्या कंपनीच्या सातत्यपूर्ण इतिहासाचे द्योतक म्हणून २०११ मध्ये किर्लोस्कर ऑइल इंजिन्सचे झालेले वेतन करार लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदवले गेले आहेत. या यशामध्ये व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांमधील परस्पर सहकार्य महत्त्वाची भूमिका बजावते.
वेतन करार सोहळ्यास कंपनीचे अध्यक्ष श्री. अतुल किर्लोस्कर, व्यवस्थापकीय संचालक सौ. गौरी किर्लोस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राहुल सहाय, मुख्य मानव संसाधन अधिकारी श्री. जॉर्ज वर्गिस, मुख्य वित्तीय अधिकारी श्री. सचिन केजरीवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी (संचालन) श्री. मकरंद जोशी, बी टू बी विभागाचे मुख्य मानव संसाधन अधिकारी श्री. अमरजीत सिंग, उत्पादन विभागातील मानव संसाधन विभाग प्रमुख श्री. वीरेंद्र गायकवाड आणि फॅक्टरी मॅनेजर श्री. मिलिंद बोटे यांच्यासह कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनातील प्रमुख सदस्य उपस्थित होते.
कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष श्री. संजीव गायकवाड, उपाध्यक्ष श्री. राजेंद्र येडे, सचिव श्री. उल्हास खुटवड आणि कोषाध्यक्ष श्री. विकास कोरे यांनी प्रतिनिधित्व केले. हा करार कंपनी व्यवस्थापन आणि कामगार यांच्यातील परस्पर विश्वास, सहकार्य आणि सामायिक मूल्यांचे प्रतीक आहे.
या यशस्वी वेतन करारामुळे किर्लोस्कर ऑइल इंजिन्सच्या प्रगत आणि कर्मचारी-केंद्रित कार्यसंस्कृती निर्माण करण्याच्या वचनबद्धतेला आणखी बळकटी मिळाली आहे. कंपनीचा विकास, नवकल्पना आणि कार्यक्षमतेला प्राधान्य देत औद्योगिक सौहार्द टिकवून ठेवण्याच्या दिशेने कंपनी सातत्याने पुढे जात आहे. किर्लोस्कर ऑइल इंजिन्स ही केवळ औद्योगिक क्षेत्रातील सौदार्ह्यास चालना देणारी कंपनी नसून विविध उद्योगांमध्ये शाश्वत, कार्यक्षम आणि नाविन्यपूर्ण उत्पादने प्रदान करणे हेच कंपनीचे व्यापक ध्येय आहे.
किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड:
किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड ही इंजिन, जनसेट्स आणि कृषी उपकरणे तयार करणारी आघाडीची उत्पादक कंपनी आहे. कंपनी वीज निर्मिती, उद्योग, शेती आणि सागरी क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावते. किर्लोस्कर ग्रुपच्या प्रमुख कंपन्यांपैकी एक असलेल्या, किर्लोस्कर ऑइल इंजिन्सची ओळख नाविन्य, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनासाठी आहे. जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवत कंपनी ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रातील भविष्य घडवण्यासाठी शाश्वत आणि कार्यक्षम उपाय प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहे.
व्हीएलएफ टेनिस इलेक्ट्रिक स्कूटर:
हलके आणि मजबूत फ्रेम
मोठे टायर्स आणि काढता येणारी बॅटरी
कॅन्टीलिव्हर सस्पेन्शन
3 रायडिंग मोड्स आणि 130 किमी पर्यंत रेंज
मोटोहाउसचे व्यवस्थापकीय संचालक श्री. तुषार शेळके यांचा संदेश – “मोटोहाउस केवळ व्यवसायाचा विस्तार करत नसून, भारतीयांचा राइडिंग अनुभव नव्याने परिभाषित करत आहे. जागतिक दर्जाच्या दुचाकी भारतीय बाजारपेठेत आणण्याचा आमचा संकल्प आहे. प्रत्येक नवीन डीलरशिपसह आम्ही परफॉर्मन्स, टिकाव आणि ग्राहक समाधानीतेला प्राधान्य देत आहोत. सांगली आणि परिसर आमच्यासाठी महत्त्वाचा बाजार आहे आणि येथील बाईक कल्चरमध्ये आम्ही महत्त्वाची भूमिका निभावू इच्छितो.”
प्रिमियम डीलरशिप आणि उत्कृष्ट सेवा
• 1000 चौरस फूट शोरूम आणि 400 चौरस फूट वर्कशॉप
• 2 वर्षे ब्रिक्स्टन मोटरसायकल्स स्टँडर्ड वॉरंटी + 2 वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी
• व्हीएलएफ टेनिस इलेक्ट्रिक स्कूटर – 2 वर्षे वाहन वॉरंटी + 3 वर्षे बॅटरी वॉरंटी
मोटोहाउस भारतभर विस्तार :
मोटोहाउस 2025 च्या मध्यापर्यंत 20 नवीन डीलरशिप उघडण्याच्या तयारीत आहे. मुंबई, पुणे, चेन्नई, मैसूर, हैदराबाद, रायपूर, दिल्ली, जयपूर येथे लवकरच नवीन शाखा सुरू होणार आहेत.
किंमत (एक्स-शोरूम, भारत)
व्हीएलएफ टेनिस इलेक्ट्रिक स्कूटर: ₹1,29,999*
ब्रिक्स्टन क्रॉसफायर 500एक्स आणि क्रॉसफायर 500 एक्ससी:₹4,74,100* पासून
ब्रिक्स्टन क्रॉमवेल 1200: ₹7,83,999*
ब्रिक्स्टन क्रॉमवेल 1200एक्स (मर्यादित 100 युनिट्स): ₹9,10,600*
मोटोहाउस बद्दल:
मोटोहाउस ही केएडब्ल्यू वेलोस मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड अर्थात केव्हीएमपीएल ची संकल्पना असून, प्रीमियम मोटरसायकल्स आणि इलेक्ट्रिक स्कूटर्ससाठी नाविन्यपूर्ण सेवा देण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. 1962 मध्ये स्थापन झालेल्या केएडब्ल्यू ग्रुपच्या वारशातून, मोटोहाउस भारतीय दुचाकी बाजारपेठेत नाविन्य आणि दर्जाच्या उच्चतम स्तरावर कार्यरत आहे. इलेक्ट्रॉनिक वाहने आणि आयसीई (इंटर्नल कम्बस्टन इंजिन) मॉडेल्स एकत्र आणत, मोटोहाउस ग्राहकांच्या प्राधान्यांना लक्षात घेऊन उत्पादने सादर करत आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या:
मोटोहाउस अधिकृत वेबसाईट
Facebook | LinkedIn | Instagram
C.A.R.E. मोमेंटम धोरण वापरून हा फंड मजबूत प्राइस अॅक्शन, महसूल वाढ आणि नफा वृद्धी दर्शवणाऱ्या स्टॉक्सची निवड करतो. बाजारातील घसरणीच्या काळात लवचिकताही टिकवून ठेवत ही बहुआयामी व्यवस्था पोर्टफोलिओ उच्च-वाढीच्या संधींशी सुसंगत राहील हे सुनिश्चित करते.
या सादरीकरणाबद्दल बोलताना सॅमको अॅसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी विराज गांधी म्हणाले, “सध्याच्या बाजारात भारतातील लार्ज-कॅप स्टॉक्स चांगली गुंतवणूक संधी निर्माण करत मिड आणि स्मॉल-कॅपच्या तुलनेत आकर्षक झाले आहेत. काही काळासाठी मिड आणि स्मॉल-कॅप स्टॉक्सने मोठी कामगिरी केली असली, तरी त्यांची मूल्ये आता अधिक प्रमाणात वाढली आहेत. याउलट, लार्ज-कॅप कंपन्या चांगली जोखीम-समायोजित परताव्याची संधी आणि स्थिरता देतात. मजबूत पाया आणि सुधारलेल्या उत्पन्नाच्या संधी यांसह अग्रणी 100 कंपन्यांचे लार्ज-कॅप पुढील बाजारवाढीचे नेतृत्व करणार आहेत. यामुळे सॅमको लार्ज-कॅप फंड सादर करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. हा फंड शिस्तबद्ध, C.A.R.E. मोमेंटम-आधारित धोरण वापरून या संधीचा लाभ घेण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. हा दृष्टिकोन परिपूर्ण, रिलेटिव्ह मोमेंटम आणि गतिशील जोखीम व्यवस्थापन यावर केंद्रित आहे.गुंतवणूकदारांना संभाव्य वाढीचा लाभ घेण्याची संधी मिळेल, तसेच संभाव्य जोखीम कमी करण्यावर भर देता येईल.”हा फंड श्रीमती निराली भन्साळी, श्री. उमेशकुमार मेहता आणि श्री. धवल घनश्याम धनानी यांच्याद्वारे व्यवस्थापित केला जाईल. त्यांचा मूलभूत आणि मोमेंटम-आधारित गुंतवणुकीतील गाढा अनुभव गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त परतावा मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
सॅमको अॅसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सीआयओ श्री. उमेशकुमार मेहता म्हणाले, “लार्ज-कॅप कंपन्या स्थिरता आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी आदर्श पर्याय आहेत. आमच्या सक्रिय स्टॉक सिलेक्शन प्रक्रियेद्वारे मजबूत मोमेंटम निर्देशांक असलेल्या स्टॉक्सची निवड करून पारंपरिक पॅसिव्ह लार्ज-कॅप स्ट्रॅटेजीपेक्षा अधिक चांगली कामगिरी करणे आमचे उद्दिष्ट असेल. आमच्या शिस्तबद्ध दृष्टीकोनातून जोखीम-आणि त्या अनुषंगाने परतावा यासाठी पोर्टफोलिओ बनवणे सुनिश्चित होते.”
सॅमको लार्ज कॅप फंड Nifty 100 Total Returns Index (TRI) शी संलग्न असून भारतातील आघाडीच्या 100 लार्ज-कॅप स्टॉक्स मधील गुंतवणुकीशी जुळणारा मापदंड आहे. किमान 5,000 रु. ची एकरकमी गुंतवणूक आणि किमान 12 हप्त्यांसाठी 500 रु. ची एसआयपी गुंतवणूक करून यात सहभागी होता येऊ शकते.
सॅमको लार्ज कॅप फंड आणि एनएफओ बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या https://www.samcomf.com/mutual-funds/samco-large-cap-fund-direct-growth/lcdgg या वेबसाईटला भेट द्या
आज हा समूह हिंदुजा फाउंडेशनच्या माध्यमातून ‘रोड टू स्कूल’ आणि ‘रोड टू लाईवलीहूड’ या उपक्रमांमध्ये भारतभर ७,००,००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण प्रदान करत आहे. २०३० सालापर्यंत १ मिलियन विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्याच्या योजनेसह हिंदुजा फाउंडेशन शिक्षणामध्ये परिवर्तनाचा मुख्य स्रोत बनून सातत्याने प्रोत्साहन देत आहे आणि २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या भारताच्या दृष्टिकोनामध्ये प्रमुख योगदान देत आहे.
या समारोहाचे प्रमुख अतिथी म्हणून भारताचे माननीय उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखड आणि त्यांच्यासह अनेक इतर मान्यवर देखील उपस्थित होते. महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन देखील विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. माननीय उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखड यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या लक्षणीय शैक्षणिक आणि अभ्यासक्रमबाह्य यशासाठी सन्मानित केले.
हिंदुजा कॉलेजची ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभामध्ये विद्यार्थी आणि मान्यवरांना संबोधित करताना, भारताचे माननीय उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखड म्हणाले, “सनातन हा देशाच्या संस्कृतीचा व शिक्षणाचा भाग असला पाहिजे कारण हे समावेशकतेचे प्रतीक आहे आणि यामध्ये आपली मुळे घट्ट रुजलेली असावीत यावर भर दिला. त्यांनी कॉर्पोरेट इंडियाला आग्रह केला की त्यांनी विशेष संस्था निर्माण करण्यासाठी शिक्षणामध्ये गुंतवणूक करावी. परोपकारी प्रयत्न हे कमॉडिफिकेशन आणि व्यावसायीकरणाच्या सिद्धांतांनी प्रेरित नसावेत. आपल्या आरोग्य सेवा आणि शिक्षण प्रणाली याने ग्रस्त आहे. त्यांनी शिक्षण हे सर्वात प्रभावी परिवर्तनकारी तंत्र देखील आहे, जे समानता घडवून आणते.” त्यांनी असा विश्वास व्यक्त केला की, हिंदुजा कॉलेज डीम्ड युनिव्हर्सिटी बनण्यापुरते मर्यादित राहणार नाही तर जागतिक प्रतिष्ठेची संस्था बनेल.
हा टप्पा पार केल्याबद्दल हिंदुजा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अशोक हिंदुजा म्हणाले, “संस्था एक कौशल्य विकास केंद्र स्थापित करण्यासाठी सज्ज आहे, जे उद्योग आणि शिक्षणादरम्यानचे अंतर कमी करण्यासाठीची वचनबद्धता मजबूत करेल, त्यासोबतच डीम्ड युनिव्हर्सिटी बनण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या क्षमता अनेक पटींनी वाढवण्याच्या दीर्घकालीन योजना देखील आहेत. हे कॉलेज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स आणि वेल्थ मॅनेजमेंटमध्ये नवीन कार्यक्रम सुरु करण्याची योजना तयार करत आहे, त्यासोबतच क्लायमेट फायनान्स आणि निर्यात आयात व्यवस्थापनामध्ये विशेष अभ्यासक्रम देखील सुरु करेल.”
श्री अशोक हिंदुजा यांनी सरकारकडून शिक्षणामध्ये सनातन सिद्धांतांचा समावेश करण्यावर विचार करण्याचा देखील आग्रह केला. या सूचनेशी सहमती दर्शविताना माननीय उपराष्ट्रपती म्हणाले, “सनातन समावेशकतेला प्रोत्साहन देते.”
हिंदुजा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री पॉल अब्राहम म्हणाले, “हिंदुजा कॉलेजमध्ये पुनर्विकास केला जात आहे, अत्याधुनिक पायाभूत संरचना आणि आधुनिक सुविधांनी सज्ज असलेली अत्याधुनिक, अनेक मजल्यांची सुविधा तयार केली आहे. आशा आहे की, ही महत्त्वाकांक्षी योजना २०२८ पर्यंत पूर्ण होईल. आम्हाला आशा आहे की, नवीन सुविधा कॉलेजच्या भौतिक क्षमता तीन पटींनी वाढवेल जेणेकरून संधींच्या एका स्पेक्ट्रममध्ये डिजिटल आउटरीच आणि प्रोग्रामिंगच्या क्षमता वाढवल्या जाऊ शकतील.”
हिंदुजा कॉलेजमध्ये ३० पेक्षा जास्त शैक्षणिक कार्यक्रम आहेत आणि त्यांना २०२३-२४ मध्ये एनएएसी ए+ मान्यता मिळाली आहे. २०२२ मध्ये स्वायत्त दर्जा देण्यात आलेल्या या कॉलेजने विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार कौशल्यांनी सज्ज करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ला अनुरूप पावले उचलली आहेत.कॉलेजचे व्हिजन स्पष्ट आहे: “आमच्या विद्यार्थ्यांना फक्त उत्कृष्टतेसाठी नाही तर इतरांपेक्षा पुढे जाण्यासाठी सशक्त बनवणे.” विद्यार्थ्यांना सशक्त बनवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा हा एक भाग आहे.