राजर्षी छ, शाहू महाराज जयंती निमित्त बिंदू चौकात लोकराजा छ,राजर्षी शाहू प्रतिष्ठान च्या वतीने छ, शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार मदन पाटील यांच्या हस्ते अर्पण करणेत आला, यावेळी,बाबा महाडिक,राजू सावंत,हिंदुराव हुजरे पाटील,चंद्रकांत पाटील,वसंत लिंगणुरकर,अजित राडे, प्रसाद जाधव,शिवाजीराव लोंढे,रमाकांत आंग्रे, विलास भोंगळे, तसेच राजमाता जिजाऊ ब्रिग्रेड च्या सुनीता पाटील,स्वाती मिठारी,शारदा पाटील,सुषमा डांगरे, सुवर्ण मिठारी,लता जगताप, आदी महिला उपस्तीत होते
सरोज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या वतीने स्वर्गीय परशुराम जाधव बापू यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेली कोल्हापुरातील श्री देवी इंदूमती बोर्डिंगची नूतन इमारत श्रीमंत शाहू महाराज यांच्या शुभहस्ते आज बोर्डिंग व्यवस्थापनाकडे सुपुर्द करण्यात आली.
समाजातील वेगवेगळ्या जाती-धर्माच्या गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांची शिक्षण घेत असताना गैरसोय होऊ नये म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूरमध्ये अनेक वस्तिगृह व बोर्डिंगची स्थापना केली. शाहू महाराजांच्या याच दूरदृष्टीने कोल्हापूरला ‘विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांची नगरी’ म्हणून ओळख प्राप्त झाली.
या इमारतीला सुमारे 125 वर्षे पूर्ण झाल्याने या इमारतीची डागडूजी करणे गरजेचे होते. आणि त्यासाठी सरोज ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक दिपक जाधव आणि भरत जाधव यांनी आपले वडील आदरणीय बापू जाधव यांच्या स्मरनार्थ ही इमारत बांधून दिली. कोल्हापूरकरांच्या दातृत्वाचा हे अनोखे उदाहरण आहे.
राजर्षी शाहू महाराज यांचे मागासवर्गीय कल्याणाबाबत उदात्त धोरण होते. असेच धोरण राज्य शासनाचे असून समाज कल्याण विभाग कोल्हापूर यांच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या जिल्ह्यातील ४६ वसतिगृहांमध्ये अत्याधुनिक लॅब विकसित करण्यात येणार आहे.
यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, सरोज ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक दिपक जाधव व भरत जाधव, श्री देवी इंदूमती बोर्डिंगचे चेअरमन दुर्वास कदम, माजी उपमहापौर भूपाल शेटे, बोर्डिंगचे व्हाईस चेअरमन किशोर कटके, अरुण सातपुते, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, माजी नगरसेविका वृषाली कदम, समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे, अनिल घाटगे यांच्यासह बोर्डिंगचे सर्व संचालक उपस्थित होते.
आज दिनांक २६ जून रोजी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर संस्कृतिक सभागृह, रिलायन्स मॉल जवळ, लक्ष्मीपुरी येथे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी अश्किन आजरेकर,विकी कांबळे, विकास माजगावकर, सुरेश घवरी, हणमंत कांबळे, रामभाऊ कांबळे,समाधान काळे, यासीन पन्हाळकर, रोहित माजगावकर, सागर कांबळे, पिंटू शिंगे व देशप्रेमी कट्टा ग्रुप चे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भागातील ज्येष्ठ नागरिक व युवक उपस्थित होते.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पतसंस्था ,कोंडा ओळ येथे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृती अभिवादन करताना अश्किन आजरेकर, माजी नगसेवक रमेश पोवार, जितेंद्र काळे, नजीर थोडगे, समाधान काळे, पापू कोंडेकर, दीपक कोंडेकर ,अरुण जमादार, भरत कांबळे,मतीन बोधले व इतर मान्यवर उपस्थित होते.
