मुंबई, :ठाकूर ग्लोबल बिझनेस स्कूल, कांदिवली तर्फे आज त्यांच्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (पीजीडीएम) या कार्यक्रमाच्या वर्ष २०२३-२४ साठीच्या प्रवेश प्रक्रियेची सुरुवात करत असल्याची घोषणा करण्यात आली. इच्छूक उमेदवार प्रवेश अर्ज या लिंक वर क्लिक करुन ऑनलाईन अर्ज करु शकतील.
या प्रवेशासंदर्भात विद्यार्थांना अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तज्ञ काऊन्सेलर्स ९८१९७५५३०१ या क्रमांकावर उपलब्ध असतील. टीजीबीएस मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी करु शकतात. काउन्सेलिंग हे सोमवार ते शनिवार सकाळी १० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत उपलब्ध असतील. ठाकूर ग्लोबल बिझनेस स्कूल ने नेहमीच भविष्यातील नेत्यांचा सक्षम समाज निर्माण करण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर दिला आहे. या कार्यक्रमाचे डिझाईन व्यावासायिकतेचा पाया भक्कम करुन मार्केटिंग, फायनान्स, ह्युमन रिसोर्स आणि ऑपरेशन्स मॅनेजमेंट सारख्या क्षेत्रात विशेष प्राविण्य प्राप्त करण्याच्या हेतूने करण्यात आले आहे.
ठाकूर ग्लोबल बिझनेस स्कूल ही सर्वोत्कृष्ट पायभूत सुविधा, आंतराष्ट्रीय स्तरावरील अनुभवी प्रशिक्षक आणि औद्योगिक क्षेत्रातील गरजांनुसार अभ्यासक्रमासाठी प्रसिध्द आहे. संस्थे ने नेहमीच भविष्यातील व्यावसायिक नेते तयार करण्यावर भर दिला असून हे नेते जागतिक स्तरावरील व्यवसायात वाढ, नाविन्य आणि शाश्वत विकासावर भर देत असतात.
“ भविष्यातील प्रतिथयश व्यावसायिक नेत्यांना ठाकूर ग्लोबल बिझनेस स्कूल मध्ये आमंत्रित करतांना आंम्हाला आनंद होत आहे. जागतिक व्यावसायिक पटलावर यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये देण्यासाठी लागणारे गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. हा अभ्यासक्रम अशा प्रकारे डिझाईन करण्यात आला आहे ज्यामुळे व्यवसायातील पदवीधर निर्माण होऊन ते व्यवसाय क्षेत्रातील सातत्याने बदलणार्या आव्हानांचा मुकाबला करु शकतील.” असे ठाकूर ग्लोबल बिझनेस स्कूल च्या संचालिका आणि इनचार्ज डॉ. सुरभी गौतम यांनी सांगितले.