Friday, June 20, 2025
Home Mirror Kolhapur आत्मनिर्भर निवेशक होण्याच्या दृष्टीने सीडीएसएल आयपीएफ ने विद्यार्थी, तसेच प्राध्यापकांना शिक्षित करण्यासाठी...

आत्मनिर्भर निवेशक होण्याच्या दृष्टीने सीडीएसएल आयपीएफ ने विद्यार्थी, तसेच प्राध्यापकांना शिक्षित करण्यासाठी कोल्हापुरात गुंतवणूक जागृती कार्यक्रम आयोजित केला

कोल्हापूर, सप्टेंबर 18, 2024: सीडीएसएल इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड (सीडीएसएल आयपीएफ ) ने कोल्हापुरातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी गुंतवणूक जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कोल्हापूरच्या डीबीआरके कॉलेजमध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आर्थिक साक्षरतेला चालना देण्यावर आणि भांडवली बाजारातील गुंतवणुकीबाबत माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी गुंतवणूकदारांना सक्षम बनविणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता, तसेच गुंतवणुकीच्या मुख्य तत्त्वांची माहिती देण्यात आली.
या उपक्रमाला मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहावेत, यासाठी हा कार्यक्रम मराठी आणि इंग्रजी भाषेत आयोजित करण्यात आला होता. वक्त्यांनी विद्यार्थींसाठी गुंतवणुकीच्या संकल्पना सोप्या करून तर सांगितल्याच, पण गुंतवणुकीची मूलभूत माहिती आणि डिपॉझिटरीजचे कार्यही समजावून सांगितले.
भांडवली बाजारातील आर्थिक समावेशन साध्य करण्यासाठी गुंतवणूकदारांचे शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावते. हे लक्षात घेऊन गुंतवणूकदारांना भांडवली बाजारातील गुंतागुंत आत्मविश्वासाने नेव्हिगेट करण्यासाठी आणि #आत्मनिर्भरनिवेशक होण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करणे हे सीडीएसएल आयपीएफ चे उद्दिष्ट आहे.
आर्थिक साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी वचनबद्ध असलेले सीडीएसएल आयपीएफ यंदा देशभरात आणखी गुंतवणूकदार जागरुकता कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे.

RELATED ARTICLES

किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडने वेळेपूर्वीच पूर्ण केला ११वा वेतन करार

२० मार्च-किर्लोस्कर समूहाच्या प्रमुख कंपनीपैकी एक असलेल्या किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड यांनी आपला ११वा वेतन करार यशस्वीरीत्या पूर्ण केला असून तो दिलेल्या वेळेपूर्वीच संपन्न...

मोटोहाउस आता सांगलीमध्ये! ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर्ससह विस्तार

मोटोहाउस आणि एआर मोटर्स सांगली यांच्या भागीदारी झाली असून, ऑस्ट्रियन ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि इटालियन व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर आता सांगलीकरांसाठी उपलब्ध. बुकिंग आणि डिलिव्हरी देखील...

टोयोटा किर्लोस्कर मोटरने सादर केली हिलक्स ब्लॅक एडिशन – धाडस, ताकद आणि प्रगल्भतेचे परिपूर्ण संयोजन

बंगळुरू, 8 मार्च -टोयोटा किर्लोस्कर मोटर अर्थात टीकेएमने आज भारतात नवीन हिलक्स ब्लॅक एडिशन सादर केली आहे. हे वाहन अशा ग्राहकांसाठी खास बनवले गेले...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडने वेळेपूर्वीच पूर्ण केला ११वा वेतन करार

२० मार्च-किर्लोस्कर समूहाच्या प्रमुख कंपनीपैकी एक असलेल्या किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड यांनी आपला ११वा वेतन करार यशस्वीरीत्या पूर्ण केला असून तो दिलेल्या वेळेपूर्वीच संपन्न...

मोटोहाउस आता सांगलीमध्ये! ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर्ससह विस्तार

मोटोहाउस आणि एआर मोटर्स सांगली यांच्या भागीदारी झाली असून, ऑस्ट्रियन ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि इटालियन व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर आता सांगलीकरांसाठी उपलब्ध. बुकिंग आणि डिलिव्हरी देखील...

टोयोटा किर्लोस्कर मोटरने सादर केली हिलक्स ब्लॅक एडिशन – धाडस, ताकद आणि प्रगल्भतेचे परिपूर्ण संयोजन

बंगळुरू, 8 मार्च -टोयोटा किर्लोस्कर मोटर अर्थात टीकेएमने आज भारतात नवीन हिलक्स ब्लॅक एडिशन सादर केली आहे. हे वाहन अशा ग्राहकांसाठी खास बनवले गेले...

‘’महिला सबलीकरणाला’’ बळकटी देत ‘’टोयोटा किर्लोस्कर मोटर’’ साजरा करणार यावर्षीचा आंतरराष्ट्रीय महिला दिन

• लिंग आधारित समतोल आणि सर्वसमावेशनाची बांधिलकी केली अधिक दृढ बंगळुरू, ७ मार्च-महिला सबलीकरणाला बळकटी देत टोयोटा किर्लोस्कर मोटर २०२५ चा आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या...

Recent Comments