दुबईस्थित लँडमार्क ग्रूपच्या अत्यंत लोकप्रिय अशा मॅक्स फॅशन या फॅशन ब्रँडने व्यावसायिक मार्गक्रमणेत एक नवा अध्याय सुरू केला आहे. ‘न्यू न्यू यू’ या नव्या मोहिमेसाठी त्यांनी ख्यातनाम अभिनेत्री आणि स्टाइल आयकॉन कल्की कोचलीन यांना सोबत घेतले आहे. या मोहिमेतून नव्या आयामांसह वाढलेला आत्मविश्वास प्रतित होतो. स्टाइलमध्ये असलेल्या बदलात्मक प्रेरणेमुळे ग्राहकालाही स्वत:च्या नव्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेता येतो. नवे काहीतरी करण्याची प्रेरणा या नव्या कलेक्शनमधून मिळते आणि तीच या मोहिमेतून ठळकपणे मांडण्यात आली आहे. सणासुदीचे दिवस असोत की मित्रमैत्रिणी जमणार असोत (वर्कवेअर, कॅज्युअल कपडे, फ्युजन फेस्टिव्ह वेअर किंवा हायग्लॅम ओकेजन वेअर) यंदाच्या मोसमात या सर्वच स्टाइल अगदी परफेक्ट टोन सेट करतील.
इतक्या प्रचंड स्टायलिश कलेक्शनचा चेहराही तितकाच खेळकर, आपल्या व्यक्तिमत्त्वाला जपत पारंपरिक फॅशनच्या संकल्पना मोडण्याची अनोखी क्षमता असणारा हवा… आणि त्यासाठी भन्नाट कल्की कोचलीन यांच्यापेक्षा वेगळं नाव काय असू शकते… कारण आलेल्या प्रत्येक दमदार भूमिकेला एक नवा आयाम देणारी अभिनेत्री ही त्यांची ओळख आहे. या ‘न्यू न्यू यू’ कलेक्शनमधून ग्राहकांना नव्या पाश्चिमात्य आणि सणासुदीच्या स्टाइल्स आणि अॅक्सेसरीजच्या माध्यमातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे नवे कंगोरे शोधता यावेत, असा मॅक्स फॅशनचा उद्देश आहे.
‘न्यू न्यू यू’ या नावातून मॅक्स फॅशनने आपले कायमस्वरुपी वचन आताही पाळले आहे… दर आठवड्याला नव्या स्टाइल आणायच्या आणि २१० हून अधिक भारतीय शहरांमधील ५२० हून अधिक स्टोअर्स तसेच www.maxfashion.in येथे ऑनलाइन विश्वात नवी फॅशन आणि उत्साह जागवण्याचे वचन! ग्राहकांना सातत्याने नवे ट्रेंड्स उपलब्ध करून द्यायचे तसेच त्यांना सहजसुंदर आणि दमदार रिटेल आणि ऑनलाइन खरेदीचा अनुभव देऊ करायचा ही मॅक्स फॅशनची बांधिलकी या प्रयत्नांतूनही प्रतित होत आहे.