कोल्हापूर, डिसेंबर 2024: स्टार यूनियन दाई-इची लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (एसयूडी लाइफ- SUD Life) ने आपल्या युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (यूएलआयपी -ULIP) योजनेचा एक भाग म्हणून दोन नवीन फंड्स – विकसित भारत फंड आणि न्यू इंडिया लीडर्स फंड चे अनावरण (लाँच) केले आहे.
विकसित भारत फंड अशा व्यवसायांमध्ये गुंतवणूक करणार आहे, जे आजच्या भारताचे विकसित भारतामध्ये रूपांतर करण्यावर लक्ष केंद्रित करेल. विकसित भारत फंडचे मल्टी-कॅप, सेक्टर-अॅग्नॉस्टिक पोर्टफोलिओ उदयोन्मुख तसेच स्थिर कंपन्यांमध्ये गुंतवणूक करेल, जे दीर्घकालीन विकास आणि मूल्यनिर्मितीला चालना देईल. हा फंड दीर्घकालीन दृष्टिकोन असलेल्या आणि भारताच्या एकूणच विकासकथेवर विश्वास असलेल्या गुंतवणूकदारांसाठी आदर्श आहे.
दुसरीकडे, न्यू इंडिया लीडर्स फंड भारतातील नव्या आणि उदयोन्मुख व्यवसायांमध्ये गुंतवणूक करेल, भारतासाठी आणि संपूर्ण जगासाठी जे तंत्रज्ञान-आधारित नाविन्य आणि विघटनावर लक्ष केंद्रित करतात. या फंडच्या काही महत्त्वाच्या उदयोन्मुख थीम्ससह, डिजिटायझेशन, क्लाउड आणि एआय (AI)-आधारित व्यवसाय, आरोग्य आणि कल्याण तसेच तंत्रज्ञान-आधारित उत्पादने आणि सेवा यांचा समावेश असेल, इतर. हा फंड दीर्घकालीन दृष्टिकोन असलेल्या आणि वाढीव व्यवसायांसाठी काही प्रमाणात आवड असलेल्या गुंतवणूकदारांसाठी तयार केलेला आहे.
सध्या, हे फंड्स एसयूडी लाईफ स्टार ट्युलिप (SUD Life Star Tulip), एसयूडी लाईफ वेल्थ क्रियेटर( SUD Life Wealth Creator), एसयूडी लाईफ वेल्थ बिल्डर( SUD Life Wealth Builder) आणि,एसयूडी लाईफ ई- वेल्थ रॉयल ( SUD Life e-Wealth Royale) या उत्पादनांमध्ये उपलब्ध आहेत. कंपनी भविष्यात आपल्या सर्व युलिप (ULIP) योजनांमध्ये हे फंड्स उपलब्ध करणार आहे.