ग्राहक ०९ ते १४ डिसेंबर २०२४ पर्यंत सर्व इसुझु ऑथोराइज्ड डिलर सर्विस आऊटलेट्समध्ये उत्साहवर्धक सर्विस लाभांचा* आनंद घेऊ शकतात.
कोल्हापूर: इसुझुची दर्जात्मक सेवा व मालकीहक्क अनुभव देण्याप्रती असलेली कटिबद्धता कायम राखण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नासह इसुझु मोटर्स इंडिया इसुझु डी-मॅक्स पिक-अप्स आणि एसयूव्हींच्या श्रेणीसाठी देशव्यापी ‘इसुझु आय-केअर विंटर कॅम्प’ राबवणार आहे. या सर्विस कॅम्पचा देशभरातील ग्राहकांना यंदाच्या हंगामादरम्यान त्रासमुक्त ड्रायव्हिंगच्या अनुभवासाठी उत्साहवर्धक लाभ आणि प्रतिबंधात्मक देखभाल तपासणी सुविधा देण्याचा उद्देश आहे.
‘इसुझु केअर’चा उपक्रम विंटर कॅम्प ०९ ते १४ डिसेंबर २०२४ दरम्यान सर्व इसुझु ऑथोराइज्ड डिलर सर्विस आऊटलेटमध्ये कॅम्प राबवण्यात येईल. या कालावधीदरम्यान ग्राहक त्यांच्या वाहनांसाठी स्पेशल ऑफर्स व लाभांचा देखील आनंद घेऊ शकतात.
विंटर कॅम्प अहमदाबाद, बारामुल्ला, बेंगळुरू, भांडुप(मुंबई), कालिकत, भुज, चेन्नई, कोईम्बतूर, दिमापूर, दुर्गापूर , गांधीधाम, गोरखपूर, गुरुग्राम, गुवाहाटी, हिस्सार, हुबळी, हैदराबाद, इंदौर, इटानगर,जयपूर, जयगाव, जम्मू जालंधर, जोधपूर, कर्नाल, कोची, कोल्हापूर, कोलकाता, कुर्नूल, लखनौ, एलबी नगर(हैदराबाद),लेह, मदुराई, मंडी, मंगलोर, मेहसाणा, मोहाली, मुंबई, मैसूर, नागपूर, नाशिक, नवी दिल्ली ,नोएडा, नेल्लोर, पटणा, पुणे, रायपूर, रत्नागिरी, राजमुंद्री, राजकोट, सातारा, शिवमोगा, सिलीगुडी, सुरत, तिरूनवेल्ली, तिरुपती, त्रिची,त्रिवेंद्रम, वडोदरा, विजयवाडा आणि विशाखापट्टणम येथील इसुझुच्या सर्व अधिकृत सर्विस केंद्रांमध्ये राबवण्यात येईल. येथे असलेल्या इसुझूच्या सर्व अधिकृत सेवा सुविधांमध्ये विंटर कॅम्पचे आयोजन केले जाईल.
ग्राहक सर्विस बुकिंगसाठी जवळच्या इसुझु डिलर आऊटलेलशी संपर्क साधू शकतात किंवा https://www.isuzu.in/servicebooking.html या वेबसाइटला भेट देऊ शकतात. तसेच अधिक माहितीसाठी ग्राहक १८०० ४१९९ १८८ (टोल-फ्री) या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
इसुझु मोटर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड बाबत
इसुझु मोटर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (आयएमआय) ही जपानमधील इसुझु मोटर्स लिमिटेडची उपकंपनी असून तिची स्थापना ऑगस्ट २०१२ मध्ये झाली. चेन्नईत मुख्यालय असलेली ही कंपनी लोकप्रिय इसुझु डी-मॅक्स व्ही-क्रॉस या भारतातील पहिल्या जीवनशैली व साहसी पिक-अपची आणि व्यक्तिगत वाहन श्रेणीत इसुझु एमयू-एक्स या प्रीमियम ७-आसनी एसयूव्हीची आणि व्यावसायिक श्रेणीत इसुझु डी-मॅक्स पिक-अप्स – एस-कॅब व रेगुलर कॅब यांची विक्री करते. इसुझु वाहने भरवसा आणि कामगिरीसाठी जगभरात ओळखली जातात. जगभरात प्रसिद्ध असलेली इसुझु वाहने आता भारतीय बाजारपेठेतही लक्षणीय महत्त्व प्राप्त करत असून, याचे श्रेय ग्राहकांना देत असलेल्या ‘मूल्य तत्त्व’ला आहे.
इसुझु मोटर्स इंडिया या वाहनांचे उत्पादन त्यांच्या आंध्रप्रदेश राज्यातील श्रीसिटीमध्ये १०७ एकरांच्या परिसरात पसरलेल्या नवीन कारखान्यात करते. भारतीय बाजारपेठेला उत्तम दर्जाची वाहने पुरवण्याची बांधिलकी मानत कंपनीने एप्रिल २०१६ मध्ये उत्पादन सुरू केले. फेब्रुवारी २०२० मध्ये इसुझु मोटर्स इंडियाने नवीन अत्याधुनिक प्रेस शॉप केंद्र आणि इंजिन असेम्ब्ली प्लाण्टच्या उद्घाटनासह त्यांच्या फेज-२ कार्यसंचालनांच्या शुभारंभाची घोषणा केली. २०१७ मध्ये, आयएमआय ने त्यांच्या ‘मेड-इन-इंडिया’ वाहनांची निर्यात सुरू केली आणि एसआयएएम अहवालानुसार, आर्थिक वर्ष २३-२४ साठी भारताचा माल वाहतूक एलसीव्ही पिक-अप >2t<=3t श्रेणीचा #१ निर्यातक म्हणून उदयास आला आहे. ISO 9001:2015 प्रमाणित कंपनी इसुझु मोटर्स इंडिया ग्राहकांना आनंद देण्यासाठी उच्च दर्जाची उत्पादने व सेवा देण्याशी कटिबद्ध आहे.
कंपनीचे देशभरात ६५ ठिकाणी समर्पित डिलर टच-पॉइण्ट्स आहेत. कंपनी मुंबईतील नरिमन पॉइण्ट येथे लाइफस्टाइल ब्रॅण्ड शोरूमसह कॅफेचे देखील कार्यसंचालन पाहते. कंपनी आणि त्यांची उत्पादने/सेवांबाबत अधिक माहितीसाठी www.isuzu.in येथे भेट द्या.