कोल्हापूर, ता. १२ डिसेंबर : मोटोहॉस, केएडब्लू व्हेलोसे मोटर्स प्रा. लि. (KVMPL) या देशातील प्रमुख मोटारसायकल कंपनीने कोल्हापुरात आपला अधिकृत डीलर भागीदार म्हणून व्हेलोसे मोटर्ससह आपली प्रमुख आणि दुसरी डीलरशिप दाखल केली. हा मैलाचा दगड मोटोहॉसची भारतातील पाऊलखुणा वाढवण्याची वचनबद्धता दर्शवत आहे. शहरातील मोटरसायकल चालकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेल्या मोटारसायकल आणि इको-फ्रेंडली स्कूटरची उत्तम श्रेणी कंपनीने सादर केली आहे.
या नव्या शोरूममध्ये अलीकडेच दाखल करण्यात आलेल्या ऑस्ट्रियन ब्रँड ब्रिक्स्टनच्या क्रॉसफायर ५०० एक्स, क्रॉसफायर ५०० एक्ससी, क्रॉमवेल १२००, क्रॉमवेल १२०० एक्स या मोटारसायकलींसह इटालियन ब्रँड व्हीएलएफ टेनिस इलेक्ट्रिक स्कूटर अशी प्रीमियम दुचाकी वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत. मोटोहॉसने नुकत्याच दाखल केलेल्या या जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या बाइक्स भारतीय रायडर्सच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या आहेत.
ब्रिक्स्टन मोटारसायक उत्साही आणि आलिशान वाहन खरेदीदारांसाठी डिझाइन केल्या आहेत, ज्या शहरी प्रवासासह ऑफ-रोड साहसी प्रवासासाठीही उत्तम आहेत. यात एबीएस, एलईडी लाइटिंग आणि केवायबी सस्पेन्शन्स यांसारख्या आधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश आहे. या बाइक्स शहरातून साहसी किंवा समुद्रपर्यटन करणाऱ्या रायडर्सना आराम, सुरक्षितता आणि उत्तम कामगिरीचा अनुभव प्रदान करतात. दुसरीकडे, व्हीएलएफ टेनिस इलेक्ट्रिक स्कूटर, पर्यावरणपूरक, किफायतशीर उपाय शोधणाऱ्या उत्साही लोकांसाठी उत्तम पर्याय आहे. या स्कूटरचे हलके, मोठे टायर्स, काढता येण्याजोग्या बॅटरी, तीन राइडिंग मोड आणि कार्यक्षम इलेक्ट्रिक मोटर शहराच्या गजबजलेल्या रस्त्यांवर वाहन चालविण्यासाठी योग्य आहे, तर त्याचे शून्य उत्सर्जन शाश्वततेच्या उद्दिष्टांशी जुळते. या बाइक्स आणि स्कूटर एकत्रितपणे कोल्हापूरच्या वैविध्यपूर्ण रायडिंग समुदायासाठी व्यावहारिक, स्टायलिश आणि पर्यावरणाच्या दृष्टीने उत्तम पर्याय आहेत.
यावेळी बोलताना केव्हीएमपीएल-मोटोहॉसचे व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके म्हणाले, “मोटोहॉस आणि केएडब्लू व्हेलोस मोटर्सचा उद्देश भारतीय ग्राहकांना प्रीमियम, वैविध्यपूर्ण दुचाकी वाहने देणे हा आहे. परंपरा आणि नावीन्य या दोहोंचा यात संगम आहे. आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासह देशांतर्गत उत्पादनाला चालना देऊन कामगिरी, टिकाऊपणा आणि स्थानिक नावीन्यपूर्णतेला प्राधान्य देत भारताच्या दुचाकी उद्योगात परिवर्तन घडवून आणत आहोत.”
येथील ही डीलरशिप २००० चौरस फूट जागेवर पसरली असून, एक हजार चौरस फूटावरील जागेत सुसज्ज वर्कशॉप आहे. ग्राहकांना आरामदायक आणि सुखद अनुभव देण्याच्या दृष्टीने याची रचना करण्यात आली आहे. मोटोहॉस विक्रीपश्चात उत्तम सेवा आणि वॉरंटीसह ग्राहकांचा मालकी अनुभव अधिक उत्तम करते. ब्रिक्सटन मोटरसायकल दोन वर्षांची वॉरंटी आणि दोन वर्षांची विस्तारित वॉरंटी देते, तर व्हीएलएफ टेनिस इलेक्ट्रिक स्कूटरवर दोन वर्षांची वॉरंटी आणि बॅटरीवर तीन वर्षांची वॉरंटी मिळते.
मोटोहॉस मुंबई, पुणे, चेन्नई, जयपूर, अहमदाबाद आणि गोव्यासह टियर एक आणि टियर दोन शहरांमध्ये प्रीमियम रिटेल दालने सुरू करत आहे. या ब्रँडने २०२५च्या मध्यापर्यंत २० डीलरशिप उघडण्याची योजना आखली आहे, ज्यामुळे अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य होईल.
मोटोहॉसची अधिकृत वेबसाइट, सोशल मीडियावरील आणि रिटेल आउटलेटद्वारे प्री-बुकिंग सुरू झाले आहे. कंपनीने पहिल्या वर्षात दहा हजार बाईक आणि इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. डिसेंबर २०२४ पासून वाहनांचे वितरण सुरू होणार असून, पहिल्या ग्राहकांना विशेष सवलत किंमतीचा लाभ मिळू शकेल.
• व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत एक लाख २९ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते.
• क्रॉसफायर ५०० एक्स आणि क्रॉसफायर ५०० एक्ससीसाठी ब्रिक्सटन मोटरसायकलची श्रेणी चार लाख ७४ हजार शंभर रुपयांपासून सुरू होते. क्रॉमवेल १२०० ची किंमत ७,८३,९९९ रुपये आहे, तर क्रॉमवेल १२०० एक्सच्या मर्यादित आवृत्तीची (१०० युनिट) किंमत ९,१०,६०० रुपये आहे.