कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने पश्चिम महाराष्ट्रातले भव्य असे “सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनास सुरुवात झाली. देशाचे माजी पंतप्रधान अर्थतज्ज्ञ डॉ.मनमोहन सिंग यांच्या प्रतिमेस हार घालून श्रद्धांजली वाहण्यात आली आणि साध्या पद्धतीने या प्रदर्शनास सुरुवात करण्यात आली.यावेळी खासदार श्रीमंत शाहू महाराज,आमदार सतेज पाटील, गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार राजूबाबा आवळे, गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील आणि गोकुळचे संचालक सर्व नगरसेवक चंदगडचे काँग्रेसचे नेते गोपाळ पाटील,जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगिरे, कृषी संशोधन केंद्रचे डॉ.अशोक पिसाळ, कृषी विभागाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी तपोवन मैदानावर गर्दी केली होती.
या प्रदर्शनात देश विदेशातील विविधनामांकित कंपन्यांचे २०० हून अधिक स्टॉल स्टॉल लावण्यात आले आहेत. याचबरोबर पशुपक्षी दालन उभे करण्यात आले आहे.शेतकरी आपला तांदूळ घेऊन आले आहेत. विविध कंपन्यांची उत्पादने व शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान,नवीन अद्ययावत मशिनरी याठिकाणी स्टॉलच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत.
या प्रदर्शनात १५०० किलो वजनाचा मुऱ्हा जातीचा रेडा आकर्षण असणार आहे.प्रदर्शनाचे २०२४ हे ६ वे वर्ष असून या प्रदर्शनामध्ये शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री होणारा तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव, २०० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग,२०० पेक्षा अधिक पशु-पक्षांचा सहभाग आहे.शेती विषयक तज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्र याठीकणी होणार आहेत.विविध शेती अवजारे, बी-बीयाणे खते खरेदी करण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे.फुलांचे प्रदर्शन व विक्री विविध सांस्कृतिक कार्यक्रम व बचत गटांचे मोफत स्टॉल,लहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्क आदींचा समावेश आहे.