एनएफओ खुला होण्याचा दिनांक 5 मार्च 2025 आणि 19 मार्च 2025 रोजी बंद होणार
• सक्रियपणे व्यवस्थापित फंड सॅमकोच्या मालकीच्या C.A.R.E. मोमेंटम स्ट्रॅटेजीवर आधारित
• भारताच्या आघाडीच्या 100 लार्ज-कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यावर भर
मुंबई,04 मार्च 2025 –सॅमको अॅसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने सॅमको लार्ज कॅप फंडसाठी न्यू फंड ऑफर (एनएफओ) सादर केली आहे. ही एक ओपन-एंडेड इक्विटी योजना असून ती लार्ज-कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्यावर केंद्रित असेल. हा एनएफओ 5 मार्च 2025 ते 19 मार्च 2025 या कालावधीत सबस्क्रीब्शनसाठी उपलब्ध असेल.या फंडाचा उद्देश भारताच्या अग्रणी 100 लार्ज-कॅप कंपन्यांचा वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ उभारून दीर्घकालीन भांडवली वृद्धी साध्य करणे हा आहे. सॅमकोची C.A.R.E. मोमेंटम स्ट्रॅटेजी वापरून उच्च-गुणवत्तेच्या आणि वाढीच्या संधी शोधल्या जातील.
बाजार वरखाली होत असतानाही स्थिरता आणि सातत्यपूर्ण परतावा देत लार्ज-कॅप क्षेत्र गुंतवणुकीसाठी पसंतीचे क्षेत्र राहिले आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असताना मजबूत पायासह प्रस्थापित व्यवसायांच्या आधारावर लार्ज-कॅप फंडांनी उत्तम कामगिरी दर्शवली आहे. गुंतवणूकदारांना जोखीम आणि परतावा यामधील संतुलन राखावे लागत असताना सुव्यवस्थित लार्ज-कॅप पोर्टफोलिओ दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा महत्त्वाचा घटक ठरतो.
बाजारातील कामगिरी निर्देशांकावर आधारित प्रभावीपणे स्टॉक्स निवड करणाऱ्या C.A.R.E. मोमेंटम स्ट्रॅटेजीचा लाभ घेण्याच्या दृष्टीने सॅमको लार्ज कॅप फंडची रचना करण्यात आली आहे. हा फंड जास्तीत जास्त मालमत्ता वाटप सुनिश्चित करत किमान 80% गुंतवणूक लार्ज-कॅप इक्विटीजमध्ये करतो, त्यामुळे गुंतवणूकदारांना चांगले काम करत असलेल्या आणि मजबूत व्यवसायांमध्ये सहभाग घेण्याची संधी मिळते. बाजारातील अस्थिरतेचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या भांडवलाचे संरक्षण करत हा फंड टॅक्टिकल हेजिंग आणि डेरिव्हेटिव्ह स्ट्रॅटेजीचे एकत्रीकरण करतो.
C.A.R.E. मोमेंटम धोरण वापरून हा फंड मजबूत प्राइस अॅक्शन, महसूल वाढ आणि नफा वृद्धी दर्शवणाऱ्या स्टॉक्सची निवड करतो. बाजारातील घसरणीच्या काळात लवचिकताही टिकवून ठेवत ही बहुआयामी व्यवस्था पोर्टफोलिओ उच्च-वाढीच्या संधींशी सुसंगत राहील हे सुनिश्चित करते.
या सादरीकरणाबद्दल बोलताना सॅमको अॅसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी विराज गांधी म्हणाले, “सध्याच्या बाजारात भारतातील लार्ज-कॅप स्टॉक्स चांगली गुंतवणूक संधी निर्माण करत मिड आणि स्मॉल-कॅपच्या तुलनेत आकर्षक झाले आहेत. काही काळासाठी मिड आणि स्मॉल-कॅप स्टॉक्सने मोठी कामगिरी केली असली, तरी त्यांची मूल्ये आता अधिक प्रमाणात वाढली आहेत. याउलट, लार्ज-कॅप कंपन्या चांगली जोखीम-समायोजित परताव्याची संधी आणि स्थिरता देतात. मजबूत पाया आणि सुधारलेल्या उत्पन्नाच्या संधी यांसह अग्रणी 100 कंपन्यांचे लार्ज-कॅप पुढील बाजारवाढीचे नेतृत्व करणार आहेत. यामुळे सॅमको लार्ज-कॅप फंड सादर करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. हा फंड शिस्तबद्ध, C.A.R.E. मोमेंटम-आधारित धोरण वापरून या संधीचा लाभ घेण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. हा दृष्टिकोन परिपूर्ण, रिलेटिव्ह मोमेंटम आणि गतिशील जोखीम व्यवस्थापन यावर केंद्रित आहे.गुंतवणूकदारांना संभाव्य वाढीचा लाभ घेण्याची संधी मिळेल, तसेच संभाव्य जोखीम कमी करण्यावर भर देता येईल.”हा फंड श्रीमती निराली भन्साळी, श्री. उमेशकुमार मेहता आणि श्री. धवल घनश्याम धनानी यांच्याद्वारे व्यवस्थापित केला जाईल. त्यांचा मूलभूत आणि मोमेंटम-आधारित गुंतवणुकीतील गाढा अनुभव गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त परतावा मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
सॅमको अॅसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सीआयओ श्री. उमेशकुमार मेहता म्हणाले, “लार्ज-कॅप कंपन्या स्थिरता आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी आदर्श पर्याय आहेत. आमच्या सक्रिय स्टॉक सिलेक्शन प्रक्रियेद्वारे मजबूत मोमेंटम निर्देशांक असलेल्या स्टॉक्सची निवड करून पारंपरिक पॅसिव्ह लार्ज-कॅप स्ट्रॅटेजीपेक्षा अधिक चांगली कामगिरी करणे आमचे उद्दिष्ट असेल. आमच्या शिस्तबद्ध दृष्टीकोनातून जोखीम-आणि त्या अनुषंगाने परतावा यासाठी पोर्टफोलिओ बनवणे सुनिश्चित होते.”
सॅमको लार्ज कॅप फंड Nifty 100 Total Returns Index (TRI) शी संलग्न असून भारतातील आघाडीच्या 100 लार्ज-कॅप स्टॉक्स मधील गुंतवणुकीशी जुळणारा मापदंड आहे. किमान 5,000 रु. ची एकरकमी गुंतवणूक आणि किमान 12 हप्त्यांसाठी 500 रु. ची एसआयपी गुंतवणूक करून यात सहभागी होता येऊ शकते.
सॅमको लार्ज कॅप फंड आणि एनएफओ बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या https://www.samcomf.com/mutual-funds/samco-large-cap-fund-direct-growth/lcdgg या वेबसाईटला भेट द्या