कोल्हापूर: सर्वात विश्वासार्ह स्मार्टफोन सेवा प्रदाता असलेल्या रियलमीने आज रियलमी १२ प्रो सीरीज ५जी च्या लाँचची घोषणा केली, जो त्याच्या प्रीमियम नंबर सिरीजमधील सर्वात नवीन भर आहे. रियलमी १२ प्रो सीरीज ५जी अंतर्गत दोन स्टँडआउट स्मार्टफोन्स सादर करण्यात आले आहेत: रियलमी १२ प्रो प्लस ५जी आणि रियलमी १२ प्रो ५जी हे दोन नवीन ॲडिशन्स नेक्स्ट-जनरेशन इमेजिंग स्मार्टफोन्स आहेत, जे रियलमीच्या सुधारित ‘मेक इट रिअल’ या ब्रँड स्पिरिटशी एकरूप होऊन रियलमीच्या प्रवासातील एका महत्त्वाच्या टप्प्याला चिन्हांकित करतात आणि तरुण वापरकर्त्यांना साजेशी असणारी करणारी ब्रँडची एक अगदी नवीन ओळख प्रदान करतात.
रियलमी १२ प्रो प्लस ५जी मध्ये फ्लॅगशिप ६४ एमपी पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा,३एक्स ऑप्टिकल झूम आणि ६एक्स इन-सेन्सर झूमसह ओ व्ही ६४बी सेन्सरसह तिच्या क्लासमधील सर्वात मोठी पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स आहे. ६एक इन-सेन्सर झूम या लेन्सला सर्वोत्तम पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स बनवते. यात १२०एच झेड कर्व्ह व्हिजन डिस्प्ले आणि ६७डब्ल्यू सुपरवूक चार्जिंग ५००० एम ए एच च्या भक्कम बॅटरीसह उपलब्ध आहे. एवढेच नव्हे, तर यात स्नॅपड्रॅगन ७एस जनरेशन २ चिपसेटही उपस्थित आहे, जे डॉल्बी ॲटमॉसला सपोर्ट करते. रियलमी १२ प्रो प्लस ५जी तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे: सबमरीन ब्लू, नेव्हिगेटर बेज आणि एक्सप्लोरर रेड, जे तीन स्टोरेज प्रकारांमध्ये येतील: ८जीबी +१२८जीबी, (किंमत रु. २९,९९९),८जीबी + २५६ जीबी (किंमत रु.३१,९९९ आणि १२जीबी+२५६जीबी (रु.३३,९९९).
रियलमी १२ प्रो ५जी मध्ये फ्लॅगशिप-लेव्हलचे १२०एच झेड कर्व्ह व्हिजन डिस्प्ले आहे. हे स्नॅपड्रॅगन ६ जीइएन १ चिपसेट, ३२एमपी सोनी आयएमएक्स ७०९ टेलीफोटो कॅमेरा, ५०एमपी सोनी आयएमएक्स ८८२ मुख्य कॅमेरा आणि ८एमपी अल्ट्रा वाइड कॅमेरा, ६७डब्ल्यू सुपरवूक चार्जयुक्त ५००० एमएएचच्या भक्कम बॅटरीने सुसज्ज आहे आणि डॉल्बी ॲटमॉसला सपोर्ट करते. रियलमी १२ प्रो ५जीदोन रंगांमध्ये येतो: सबमरीन ब्लू आणि नेव्हिगेटर बेज; आणि दोन स्टोरेज प्रकारांमध्ये उपलब्ध असेल: ८ जीबी + १२८ जीबी (किंमत २५,९९९) आणि ८जीबी + २५६जीबी (किंमत २६,९९९) आहे.
रियलमी १२ प्रो प्लस ५जी पुढच्या पिढीतील इमेजिंग तंत्रज्ञान सादर करते आणि फुल-फोकल-लेन्थ, लॉसलेस झूम कॅपॅबिलिटीज आणि क्वालकॉमच्या सहकार्याने विकसित केलेले मालकी हक्काचे मास्टरशॉट अल्गोरिदमला सक्षम करण्यासाठी अत्याधुनिक पेरिस्कोप टेलिफोटो टेक्नॉलॉजी फीचर करते. तरुण वापरकर्त्यांसाठी फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीला नवीन उंचीवर नेण्यासाठी डिझाइन केलेला रियलमी १२ प्रो प्लस ५जी हा रियलमीचा लेटेस्ट प्रीमियम स्मार्टफोन आहे.
रिअलमी त्याच्या वापरकर्त्यांना आकर्षक डिझाइनसह नाविन्यपूर्ण टेक्नॉलॉजी उपलब्ध करवण्यात नेहमीच आघाडीवर असते. रियलमी १२ प्रो सिरीज ५जी मध्ये लक्झरी वॉच-इन्स्पायर्ड डिझाइन प्रत्यक्षपणे वापरण्यासाठी रिअलमीने डिझाइन स्टुडिओने प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय लक्झरी वॉच डिझाइन मास्टर ऑलिव्हियर सॅव्हियो सहकार्य स्थापित केले आहे.
एवढेच नव्हे तर, रिअलमीने सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीसाठीचे ऑस्कर विजेते असलेल्या क्लॉडिओ मिरांडा यांच्यासोबत केवळ या सिरीजसाठी त्यांच्या पुरस्कार-विजेत्या चित्रपटांपासून प्रेरित असलेले तीन कॅमेरा फिल्टर क्युरेट करण्यासाठी सहकार्य केले आहे. हे तीन पुढीलप्रमाणे आहेत: जर्नी फिल्टर -लाइफ ऑफ पाई ची प्रेरणा, मेमरी फिल्टर -द क्युरियस केस ऑफ बेंजामिन बटण ची स्टाईल आणि मॅव्हरिक फिल्टर – टॉप गन: मॅव्हरिक चा प्रभाव.
पहिली विक्री ६ फेब्रुवारी २०२४ ला दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होईल. युझर्स रियलमी १२ प्रो सिरीज ५जी साठी रिअलमी स्टोअर्स, realme.com आणि फ्लिपकार्टवर बँक ऑफरद्वारे रु.२,००० ची सवलत आणि १२ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआयचा लाभ घेऊ शकतात.