नवी दिल्ली : सोनी इंडियाने आज FX6 कॅमेरा (मॉडेल ILME-FX6V) ची घोषणा केली आहे, जो एक फुल फ्रेम प्रोफेशनल कॅमेरा आहे, ज्यासोबत इ-माऊंट लेन्स, 16-35mm (FE C 16-35mm T3.1 G) आहे, सोनी च्या सिनेमा लाईनमधील नवीन भर सिनेमा निर्माते आणि कंटेंट क्रिएटर्सच्या व्यापक श्रेणीसाठी इमेजिंग तंत्रज्ञानामध्ये कंपनीचा अनुभव घेऊन येत आहे. सिनेमा लाईनचा भाग म्हणून अगदी नवीन FX6 मध्ये सोनी चे इमेज सेंसर, प्रोसेसिंग इंजिन आणि AF (ऑटोफोकस) प्रदर्शन या मुख्य तंत्रज्ञानांना एकत्र केले गेले आहे.
सोनी ने नवीन 16-35mm (FE C 16-35mm T3.1 G) फुल-फ्रेम इ-माऊंट लेन्स सुरू केली आहे, जी नवीन घोषणा केलेल्या ILME-FX6V फुल फ्रेम फॉरमॅट कॅमेरा सादर करत आहे, जो व्यावसायिक व्हिडीओ निर्मितीसाठी उच्च ऑप्टीकल प्रदर्शन, विश्वसनीय कार्यप्रणाली आणि बुध्दिमान चित्रीकरण फंक्शन ऑफर करतो. VENICE इ-माऊंड कॅमेराज पासून ते Alpha™ इंटरचेंजेबल लेन्स कॅमेराजपर्यंत व्यापक श्रेणीशी अनुकूल आहे. या नव्या लेन्सची भर केल्यामुळे हा प्रोफेशनल व्हिडिओ चित्रीकरणासाठी सानुकूलित झाला आहे, जो कंटेन्ट निर्मात्यांसाठी उल्लेखनीय कलात्मक परिवर्तनशीलता देऊ करतो. सोनी भविष्यातही तिची सिनेमा लेन्समध्ये सुधारणा करत राहणार आहे.
“नवीन FX6 सोबत, सोनी सर्व प्रकारच्या व्हिज्युअल कथा सांगणार्यांसाठी अष्ठपैलू कलात्मक साधन घेऊन येत आहे आणि अखंडपणे ग्राहकंच्या गरजांवर आधारित इमेजिंग तंत्रज्ञानाच्या सीमा पुढे नेत आहे,” असे सोनी इंडियाचे मुकेश श्रीवास्तव, डिजिटल इमेजिंग अध्यक्ष म्हणाले. “आम्ही आजचे कंटेन्ट निर्माते आणि सिनेमाटोग्राफर्ससाठी उत्कृष्ट कौशल्य आणि गुणवत्तेचे संगोपन करण्याचे ध्येय ठेवले आहे. FX6 हा Sonyच्या उद्योगामधील अग्रणी VENICE सिनेमा कॅमेराकडून तंत्रज्ञानाचा वापर करत आहे आणि त्याची सोनी च्या उत्तम नवीनतम Alpha मिररलेस कॅमेरा तंत्रज्ञानाशी एकत्रीकरण करत आहे. सोनी च्या Alpha सिरीजवर आधारित “वन माऊंट” उपायासोबत; आपल्या नवीन इ-माऊंट सिनेमा लेन्स सिरीजची लवचिकता कंटेन्ट निर्मात्यांना अगदी उच्च दर्जाचा कंटेन्ट तयार करण्यासाठी प्रचंड कलात्मक स्वातंत्र्य ऑफर करते.”
