कोल्हापूर ता.14 :- शहरामध्ये आज झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये 1 टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला. सदरच्या मोहिमेचा 94 वा रविवार असून या अभियानामध्ये स्वरा फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगांवकर व कार्यकर्ते, आरोग्याधिकारी डॉ.अशोक पोळ, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, पशुवैदयकिय अधिकारी डॉ.विजय पाटील, माजी नगरसेवक विलास वास्कर, महापालिकेचे अधिकारी व सफाई कर्मचारी यांनी सोशल डिस्टंस ठेवून स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. हि मोहिम महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
सदरची स्वच्छता ताराराणी चौक ते तावडे हॉटेल संपुर्ण रोड परीसर, सायबर चौक ते शिवाजी विदयापीठ मेन रोड परिसर, सीपीआर चौक ते तोरस्कर चौक, पंचगंगा घाट, स्मशानभूमी संपूर्ण परिसर, संपूर्ण माऊली पुतळा ते जनता बाझार परिसर, क्रिडा संकुल मेन रोड परीसर, रंकाळा परीसर येथे करण्यात आली. यावेळी स्वरा फाउंडेशनच्यावतीने पंचगंगा घाट परिसर येथे स्वच्छता करण्यात आली.
स्वरा फौंडेशनच्यावतीने रंकाळा येथे स्वछता करुन वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शाखा अभियंता आर के पाटिल, स्वरा फौंडेशन महिला जिल्हाध्यक्ष सविता पाडळकर, उपाध्यक्ष पियुष हुलस्वार, फैजान देसाई, यश रुकडीकर, मुकुंद कांबळे, मानसी कांबळे, काका पडळकर, शेखर वडंणगेकर व सदस्य उपस्थित होते.
आजच्या स्वच्छता मोहिमेत 4 जेसीबी, 5 डंपर, 6 आरसी गाडया, 1 ट्रॅक्टर ट्रॉली, 2 औषध फवारणी, 1 पाणी टँकरचा वापर करण्यात आला. तसेच सदरची मोहिम महापालिकेच्या 130 स्वच्छता कर्मचा-यांच्या सहाय्याने राबविण्यात आली.
यावेळी विभागीय आरोग्य निरिक्षक राहुल राजगोळकर, निखील पाडळकर, स्वरा फाउंडेशनचे उपाध्यक्ष पियुष हुलस्वार, अमित देशपांडे, डॉ.अविनाश शिंदे, आयुष शिंदे, फैजान देसाई, यश रुकदिकर, मुकुंद कांबळे, शेखर वडंणगेकर, आरोग्य निरिक्षक निरिक्षक सुशांत कावडे, नंदकुमार पाटील, करण लाटवडे, महेश भोसले, श्रीराज होळकर, शिवाजी शिंदे, आदी उपस्थित होते.
