कोल्हापूर ता. १५ फेब्रुवारी, २०२१ कोल्हापूरवासियांना घराशेजारी बॅंकिग सुविधा उपलब्ध झाली आहे. कोल्हापूर येथील भेंडी गल्ली येथे रात्री उशीरापर्यंत सुरू असणा-या महालक्ष्मी कम्युनिकेशन या दुकानांतून बॅंकेची सर्व कामे करणे शक्य होत आहे. विशेष म्हणजे प्रिया दाते नावाची महिला हे दुकान सांभाळते.
भेंडी गल्लीच्या सुरुवातीलाच महालक्ष्मी कम्युनिकेशन आहे. या गल्लीत सोन्या-चांदीचे दागिने घडणावळीची इतर बरीच दुकाने आहेत. दुकानांमध्ये काम करणारे बहुतांश कारागीर हे बंगाल आणि महाराष्ट्राबाहेरील आहेत. याशिवाय माता अंबाबाईच्या दर्शनाला येणा-या पर्यटकांची संख्याही परिसरात अधिक आहे. दुकानांत काम करणा-या कारागिरांना आपापल्या घरी पैसे पाठविण्यासाठी प्रिया यांच्या दुकानाची मदत होते. शिवाय महालक्ष्मीच्या दर्शनाला आलेल्या पर्यटकांना, खरेदीच्या वेळी स्वतच्या खात्यातील पैसे काढण्यासाठी एटीएम किंवा अन्य बॅंक शोधावी लागत नाही. इतर बॅंकेच्या शाखांना वेळेचे बंधन असल्याने, तसेच बऱ्याच वेळा इतर बॅंकेच्या एटीएममध्ये पैसे नसल्याने, या परिसरातील नागरिकांची गैरसोय होत होती. दुकांनात काम करणा-या या कामगारांसोबतच कोल्हापूरात येणाऱ्या पर्य़टकांना रात्री उशीरापर्य़ंत आणि सुटीच्या दिवशीही सुरू असणा-या बॅंकेची गरज होती. ही गरज ओळखून फिनो पेमेंट्स बॅंकेने “फिनो हमेशा ” मोहिमेअंतर्गत या दुकानामार्फत उपलब्ध करून दिली आहे.
कुठल्याही बॅंकेच्या खात्यात रोख रक्कम जमा करणे किंवा कुठल्याही बॅंक खात्यातून रोख रक्कम काढणे किंवा रोकड हस्तांतरण करणे यासारख्या मूलभूत बॅंकिंग सेवा येथे उपलब्ध करून दिल्या जात आहेत. कोविड-१९ च्या साथीच्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे घराबाहेर पडणे अशक्य असताना, फिनो पेमेंट्स बॅंकेने लहान दुकानांमध्ये उपलब्ध करून दिलेल्या मायक्रो एटीएम उपकरणाद्वारे बॅंकेचे व्यवहार करणे सुलभ झाले. नवीन खाते उघडणे, मोबाईल, वीज बिले भरणे किंवा विमा खरेदी किंवा त्याचे ईएमआय़ भरण्यासाठी अन्यत्र बॅंक शाखा शोधत जाण्याची रहिवाशांना यापुढे गरज पडणार नाही. या सर्व सोयी फिनो पेमेंट्स बॅंकेने येथे उपलब्ध करून दिल्या आहेत.
फिनो पेमेंट्स बॅंकेचे विभागीय( झोनल) प्रमुख अर्पित खंडेलवाल यांनी बॅंकेच्या नवीन उपक्रमाबद्दल
सांगितले की, “ग्रामीण भागात आणि बॅंकशाखा किंवा एटीएम नसलेल्या ठिकाणी बँकिंग सुविधा अधिक व्यापक करण्यासाठी फिनो बॅंकेने कार्यक्षेत्र विस्तारले आहे. फिनो हमेशा या उपक्रमाअंतर्गत, ग्राहकांना कुठल्याही वेळेत, कुठेही, घराशेजारी,गावात आणि अवघ्या एका फोन कॉलवर बॅंकिंग सुविधा मिळणार आहे.
श्री. खंडेलवाल पुढे म्हणाले, “आमच्या बीपी मोबाइल बँकिंग अॅपवर उपलब्ध आमची‘ कॅश बाजार ’सेवा लोकांना जवळचा फिनो बँकिंग पॉईंट शोधून रोख रक्कम काढण्यास किंवा जमा करण्यास मदत करते, पुढील सुविधा उपलब्ध करुन देतात. कधी तरी एटीएममधील रोख रक्कम संपल्याने ग्राहकांना रिकाम्या हाती परतावे लागते, अशा वेळी बँकिंग करणे शक्य नसते परंतु फिनो पेमेंट्स बॅंकेच्या या आऊटलेसमध्ये ही समस्या कधीच उद्धभवत नाही“.कोल्हापूरात सध्या सुमारे १४४० बॅंकेचे मर्चंट आहे. आणखी सखोल विस्तार करण्याचा बॅंकेचा मानस आहे. सोबतच राज्यातील नेटवर्क दुप्पट करण्याचा विचार आहे“.
आमचे दुकान उशीरापर्यंत खुले असल्याने नागरिकांना फायदा होतो. ग्राहकांना आणि स्थानिकांना त्यांचा नोकरीधंदा आणि व्यवसायाच्या वेळा सांभाळून तसेच सुट्टीच्या दिवशीही बॅंकिंग सुविधा येथून उपलब्ध करून दिल्या जातात. व्यवहार पूर्ण करण्यासाठी तसेच दुकानांत पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकाला संतुष्ट करण्यासाठी रोख रक्कम नेहमीच उपलब्ध असल्याचे महालक्ष्मी दुकानाच्या मालक प्रिया दाते यांनी सांगितले.
तुमचा एखादा लहान व्यवसाय असल्यास फिनो पेमेंट्स बँक मर्चंट पॉईंट होण्याचा मानस असेल तर आपण आम्हाला Care@finobank.com किंवा 89555 59984 वर एक मिस कॉल करा.
संपर्क- उर्मिला देठे, स्ट्रीटलाईट मिडिया, +91 9372559740, urmila.dethe@streetlightmedia.in
