कोल्हापूर ता.19:- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महापालिकेच्यावतीने महापालिकेच्या राजर्षि छत्रपती शाहू सभागृहातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पुष्पहार अर्पण केला. उपआयुक्त निखिल मोरे यांनी यावेळी शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्रावरील स्लोकचे वाचन केले.
यावेळी उप-आयुक्त रविकांत आडसूळे, शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त संदीप घार्गे, शहर अभियंता नेत्रदिपक सरनोबत, मुख्यलेखापाल संजय सरनाईक, आरोग्य अधिकारी अशोक पोळ, उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी, संजय भोसले व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने शिवाजी चौक, निवृत्ती चौक व महापालिका राजर्षि छत्रपती शाहू सभागृहातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयांसभोवती विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
