कोल्हापूर ता. 20 : शहरातील मिरजकर तिकटी येथे खरेदीसाठी आलेल्या व विनाकारण फिरणाऱ्यां 128 नागरीकांची तपासणी मोबाईल् व्हॅनद्वारे रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये शहरातील 1 नागरीकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरामध्ये संचारबंदी आहे परंतू अत्यावश्यक कामाच्या नावाखाली नागरीक गर्दी करत आहेत. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी महापालिकेच्यावतीने मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्यात येत आहे.
