कोल्हापूर ता.24 : मंडलीक वसाहत येथील नाल्यावरील अनाधिकृत आरसीसी पुल व महानगरपालिकेच्या जागेवरील अनाधिकृत पाच बांधकामावर कारवाई करण्यात आली. विभागीय कार्यालय क्रं. 2, इस्टेट विभाग व नगररचना विभाग यांनी हि कारवाई केली. हि कारवाई 1 जेसीबी, 1 डंपरच्या सहाय्याने केली. यामध्ये ए वॉर्ड आदर्श वसाहत संभाजीनगर येथील रिसन 690 व 691 येथील साईड मार्जिन मधील अनाधिकृत कंपौडचे बांधकाम व बी वॉर्ड मंगेशकर नगर येथील किर्ती हौसिंग सोसायटीमधील चार रुमचे विनापरवाना बांधकाम पाडण्यात आले. त्याचबरोबर बी वॉर्ड रिसनं 680 व रिसनं 648 पैकी 34/36 येथील महापालिकेच्या ओपन स्पेसमधील 3 पत्र्याचे अनाधिकृत शेड काढण्यात आले. मंडलिक वसाहत येथील नाला पात्रातील आरसीसी अनाधिकृत पुलाचे अतिक्रमण यावेळी काढून टाकण्यात आले.
प्रशासक डॉ.कांदबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत व सहाय्यक संचालक नगररचना रामचंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. हि कारवाई उपशहर अभियंता नारायण भोसले, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, सहाय्यक अभियंता सतीश फप्पे, प्रमोद बराले, कनिष्ठ अभियंता अनिरुद्ध कोरडे, सागर शिंदे, मयुरी पटवेगार, गुंजन चव्हाण, सर्वेअर सुनिल ठोंबरे व पोलिस कर्मचाऱ्यांच्यामार्फत करण्यात आली.