कोल्हापूर दि १३ : वाराणसी तथा काशी ही पुरातन नगरी हिंदू धर्मियांच्या अतीव श्रद्धेचा विषय आहे. ऋग्वेदात, स्कंद पुराणात तसेच रामायण-महाभारतात काशीचा उल्लेख आढळतो. अशा या प्राचीन संस्कृतीचा वारसा असलेल्या काशी नगरीसाठी जगातील सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “दिव्य काशी, भव्य काशी” हे स्वप्न प्रत्यक्षात आणले आहे. देशाचे सर्वात लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनातून वाराणसीतील काशी विश्वेश्वर देवालय परिसराच्या केलेल्या कायापालट प्रकल्पांचा लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण आज भाजपा कोल्हापूरच्या वतीने अंबाबाई मंदिरानजीक (घाटी दरवाजा) काशी विश्वेश्वर मंदिर याठिकाणी आयोजित करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रम भक्तीमय, उत्साही, जोषपूर्ण संपन्न झाला. देशभरात सुमारे ५१ हजार ठिकाणी “दिव्य काशी, भव्य काशी” या कार्यक्रमाचे भव्य पडद्यावरून थेट प्रक्षेपण केले.
हर हर महादेवाच्या जय घोषात आज भाजपा कोल्हापूरच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाची सुरवात भजन-कीर्तनाने सुरवात करण्यात आली. यानंतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये आरती करण्यात आली. त्याचबरोबर गोरखनाथ आखाड्याचे पीरयोगी शेषनाग महाराज, आर्ट ऑफ लिव्हिंगचे (श्री श्री रविशंकर मठ) प्रमोद पाटील, अजय किल्लेदार, संतोष गोसावी यांचा भाजपा पदाधिका-यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर उपस्थित सर्वांनी मोठ्या स्क्रीनच्या माध्यमातून हा कार्यक्रम उत्साहात, भक्तीमय वातावरणात बघितला. देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी आजच्या मनोगतामध्ये देशाच्या इतिहास, संस्कृती, धर्मा याविषयी बोलत आपण सर्वांनी आपले कर्तव्य म्हणून स्वछता, सृजनता,आत्मनिर्भर भारतासाठी निरंतर प्रयत्नशील राहण्याचे आवाहन यावेळी सर्वांना केले.
याप्रसंगी भाजपा प्र.का.सदस्य महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, चंद्रकांत घाटगे, विजय आगरवाल, अजित ठाणेकर, किशोरी स्वामी, सुलभा मुजुमदार, प्रमोदिनी हर्डीकर, प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, अजित सूर्यवंशी, गायत्री राउत, सुषमा गर्दे, सुनीता सूर्यवंशी, शुभांगी चीतारे, कोमल देसाई, सुजाता पाटील, विवेक कुलकर्णी, सुधीर देसाई, आशिष कपडेकर, डॉ राजवर्धन, रविंद्र मुतगी, ओंकार खराडे, रविंद्र घाटगे, अतुल चव्हाण, धीरज पाटील, महेश यादव, दिलीप बोंद्रे, आजम जमादार, प्रसाद नरुले, गौरव सातपुते, विवेक वोरा, मनोज इंगळे, तानाजी रणदिवे, प्रकाश घाटगे, हर्षद कुंभोजकर, प्रतीम यादव यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
