गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. गोव्याचे ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सावंत कोंकणी भाषेत शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते. सावंत यांनी शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं. सावंत यांच्यासोबत विश्वजीत राणे, सुभाष शिरोडकर, मौविन गोडीन्हों, रवि नायक, निलेश काब्रल, रोहण खौंटे, अटॉनोसियो मोन्सेरात आणि गोविंद गौड आदींनाही पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली आहे.