कोल्हापूर ता.१२: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) च्या वतीने महाराष्ट्राचे गृहराज्य मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी डी.पाटीलसाहेब यांचा ५० वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते व संचालकाच्या उपस्थितीत सतेज उर्फ बंटी डी.पाटीलसाहेब यांचा सत्कार करण्यात आला.व भावी वाटचालीस गोकुळ परिवाराच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी संघाचे चेअरमन विश्वास पाटील(आबाजी), जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले,अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, अंबरिषसिंह घाटगे, आदि उपस्थित होते.
