कोल्हापूर, दि. 27 (जिमाका): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी/मार्च 2023 मध्ये होणाऱ्या इ. १२ वी व १० वी परीक्षेस खासगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी अर्ज (फॉर्म नं.१७) ऑनलाईन प्रकियेव्दारे भरुन घेण्यात येणार असल्याचे कोल्हापूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव डी.एस.पवार यांनी कळविले आहे.
त्यासाठी नमुद केलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करावयाची आहे. १२ वी व १० वी खासगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन स्वीकारण्याच्या मुदतवाढीबाबतच्या तारखा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या आहेत.
शुक्रवार दिनांक 29 जुलै ते बुधवार 24 ऑगस्ट 2022 पर्यंत -विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरणे.
सोमवार दिनांक 1 ऑगस्ट ते दिनांक 26 ऑगस्ट 2022 -विद्यार्थ्यांना मूळ अर्ज ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमुद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जमा करणे.
मंगळवार दिनांक 30 ऑगस्ट 2022 -संपर्क केंद्र शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीची एक छायाप्रत, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करणे.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना 12 वीसाठी शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत), नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधार कार्ड, 10 वी उत्तीर्णचे मुळ गुणपत्रक, 10 वीची उत्तीर्ण मुळ प्रमाणपत्र, 10 वी उत्तीर्ण झाल्यानंतरचा गॅप जर दोन वर्षापेक्षा जास्त असेल तर त्याचे प्रमाणपत्र, पासपोर्ट आकारातील फोटो.
10 वी साठी शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत), नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधार कार्ड, पोसपोर्ट साईज कारातील फोटो इत्यादी कागदपत्रे स्कॅनकरुन अपलोड करावाची आहेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे. संपूर्ण अर्ज भरुन झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्याला अर्जावर नमुद केलेल्या मेलआयडीवर पाठविण्यात येईल.
खासगी विद्यार्थ्यांनी इ. 10 वी व 12 वी साठी नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचा ऑफलाईन अर्ज स्विकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील संकेतस्थळाचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी/इंग्रजीमधून उपलब्ध आहेत त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
संकेतस्थळ- इ.१० वी http://form17.mh-ssc.ac.in व इ. १२ वी http://form17.mh-hsc.ac.in
