मुंबई ९ ऑगस्ट २०२२ : वंचित मुलांच्या शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी सामाजिक प्रभाव उपक्रमांची घोषणा आज एसआयपी अकॅडमी ने केली. एसआयपी अकॅडमी ही आता उत्तम कामगिरी करत असल्याने विशेषत: वंचित पार्श्वभूमीतील मुलांना आधार देण्यावर संस्थेचा भर आहे. अझीम प्रेमजी विद्यापीठाने केलेल्या अभ्यासातून दिसून आल्याप्रमाणे, महामारीमुळे हे आव्हान आणखी तीव्र झाले आहे. एसआयपी अकॅडमीच्या भारतातील कामकाजाच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश व्हिक्टर यांनी ही घोषणा केली.
एसआयपी फाउंडेशनच्या माध्यमातून ही संस्था आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांमधील कौशल्य विकासासाठी भारतभर अनेक उपक्रमांना पाठिंबा देत आहे. संपूर्ण भारतभरातील एसआयपी अकॅडमी कार्यक्रमांतर्गत, महामारीच्या काळात ज्यांचे पालक वारले होते अशा एकूण १४८ एसआयपी विद्यार्थ्यांना १२ महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या मासिक शुल्कात फी माफी दिली जात आहे. याशिवाय वंचित वर्गातील २२५ बालकांना ७५ टक्के पर्यंत फी सवलत दिली जाणार आहे. ही मदत देशभरातील १५ राज्यांमध्ये ४५ एसआयपी अबॅकस केंद्रांमध्ये उपलब्ध आहे.
एसआयपी फाउंडेशन कॉर्पोरेट टायअप्सच्या माध्यमातून चेन्नई, सिर्काळी (चिदंबरम) आणि शिवकाशी येथील ७ शाळांमधील मुलांना भाषा आणि साक्षरता कौशल्ये उपलब्ध करून देते. पूर्व-प्राथमिक आणि प्राथमिक वर्गांच्या शिक्षकांना इंग्रजी भाषा आणि ध्वनी संबंधित कौशल्ये (फोनेटिक स्किल्स) शिकवण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन फाउंडेशन करते. एसआयपी फाउंडेशन मुलांना पुस्तके आणि शिकवण्याची साधने, सॉफ्टवेअर प्रोग्राम आणि शिक्षकांना लेसन प्लॅन्स पुरवते. यातून मुलं अस्खलितपणे इंग्रजी वाचायला आणि बोलायला शिकतात. या कार्यक्रमात ७ शाळांमध्ये शिकणाऱ्या १००० हून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
एसआयपी अकॅडमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश व्हिक्टर म्हणाले की एसआयपी अबॅकस (भारतातील अग्रगण्य अबॅकस प्रशिक्षण कार्यक्रम), ग्लोबलआर्ट (भारतातील सर्जनशील कला प्रशिक्षण केंद्रांची आघाडीची साखळी) आणि मायकिड्स (शाळा आधारित इंग्रजी भाषेचा एक अद्वितीय कार्यक्रम) अशा कार्यक्रमांद्वारे मुलांमध्ये जीवन कौशल्ये विकसित करण्यात गुंतलेली संस्था या नात्याने मुलांना आणि शाळांना शिक्षणातील अंतर भरून काढण्यात आणि मुलांची संख्या, साक्षरता व सर्जनशील क्षमतांचा मजबूत पाया तयार करण्यास सक्षम करण्यासाठी मदत करण्याच्या अद्वितीय स्थितीत एसआयपी अकॅडमी अग्रेसर आहे.
व्हिक्टर पुढे बोलताना म्हणाले की यांनी मुलांमध्ये सॉफ्ट स्किल्स बिंबविण्याच्या महत्त्वावर भर दिला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामाजिक प्रभावाच्या उपक्रमांबद्दल जागरूकता आणि सहानुभूती वाढवण्याची गरज त्यांनी नमूद केली. मुलांच्या मानसिक क्षमतेवर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडण्याच्या एसआयपी अकॅडमी च्या दृष्टिकोनावर भर दिला जेणेकरून त्यांनी भाग घेतलेल्या विविध कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे आत्मसात केलेल्या कौशल्यांमुळे त्यांचे तारुण्य तसेच प्रौढ आयुष्य समृद्ध होईल.
चेन्नई आणि जळगाव येथे यापूर्वीच सुरू झालेल्या ३ प्रकल्पांद्वारे मियावाकी जंगले निर्माण करण्यात एसआयपी अकॅडमी चा सहभाग आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंगबाबत जागरूकता निर्माण करून आपल्या घरांमध्ये आणि समुदायांमध्ये अंमलबजावणी करणाऱ्या एसआयपी अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा त्यांनी रेनवॉटर वॉरियर्स असा उल्लेख केला. संपूर्ण चेन्नईमध्ये या उपक्रमाने १७० लाख चौरस फूट क्षेत्र व्यापले आहे.
