पूर्ण महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम अर्थातच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ १५ ऑगस्टपासून परत येत आहे. आठवड्यातले चारही दिवस हास्यरसिकांना हा कार्यक्रम बघायला मिळणार आहे. काही दिवसांची क्षणभर विश्रांती घेतल्यानंतर जत्रेकरी आता रसिकांना हसवण्यासाठी पुन्हा सज्ज झाले आहेत. टेन्शनवरची मात्रा म्हणून ओळखला जाणारा हा कार्यक्रम खरोखच रसिकांच्या घराघरांत पोहोचली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा १५ ऑगस्टपासून, सोमवार ते गुरुवार, रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर पहायला विसरू नका.
महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ह्या मंचाने रसिकांना निखळ आनंद दिला आहे. हास्य जत्रेतील एकेक पात्र रसिकांना त्यांच्या घरातलं वाटतं. रसिक मायबाप प्रेक्षक कलाकारांना त्यांच्या कामामुळे ओळखतात. जेव्हा संपूर्ण जग कोविड सारख्या महामारीने हैराण होतं, तेव्हा या कार्यक्रमानी रसिकांना दुःख, त्रास,
टेन्शन सगळं विसरायला भाग पाडलं. अनेकांना हास्याचा डोस देऊन ठणठणीत बरं केलं. त्यामुळे हास्यजत्रा पुन्हा सुरू होतेय ही रसिकांसाठी पर्वणी असणार आहे. येणाऱ्या नव्या पर्वात रसिकांना अनेक गोष्टी बघायला मिळतील. नवीन सेट, स्कीटचे वेगळे विषय, नवीन पात्रं आणि बरंच काही. निवेदिका प्राजक्ता माळी हिचं ‘वाह दादा वाह’ पुन्हा एकदाऐकायला मिळेल. हास्यरसिक प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर यांचं दर्जेदार परीक्षण बघायला मिळेल. समीर, गौरव, नम्रता, प्रसाद, दत्तू आणि इतर कलाकार यांचे दमदार अभिनय बघायला मिळतील. त्यामुळे हास्य जत्रा पुन्हा कधी सुरू होतेय आणि कधी रसिकांना खळखळून हसायला मिळतंय याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.
त्यामुळे टेन्शन विसरण्यासाठी, दुःख दूर करण्यासाठी आणि मनमुराद हसण्यासाठी पाहा, महाराष्ट्राची हास्यजत्रा -चार वार हास्याचा चौकार, १५ ऑगस्टपासून सोमवार ते गुरुवार, रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर!
