बंगलोर:ॲमेझॉन इंडिया ने आज त्यांच्या महिनाभर चालणार्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल (जीआयएफ) २०२२ मध्ये ही घोषणा केली की त्यांचा हा फेस्टिव्हल हा विक्रेते आणि ब्रॅन्ड पार्टनर्स कडून ॲमेझॉन.इन वरील हे सर्वांत मोठे सेलिब्रेशन ठरले आहे. यामुळे देशभरांतील कोट्यावधी ग्राहकांच्या चेहेर्यावर हास्य झळकले आहे. जीआयएफ २०२२ ची सुरुवात ही २२ सप्टेंबर च्या मध्यरात्री पासून प्राईम अर्ली ॲक्सेस नुसार तर सामान्य जनते साठी २३ सप्टेंबर पासून करण्यात आली होती. ग्राहकांनी ॲमेझॉन.इन वरील विक्रेत्यांच्या कोट्यावधी उत्पादनांना प्रतिसाद दिला तसेच लाखो छोट्या आणि मध्यक व्यावसायिक (एसएमबीज) च्या उत्पादनांनाही उत्तम प्रतिसाद दिला.
ग्राहकांना तसेच भारतातील विक्रेत्यांना या सणासूदीच्या दिवसात सेवा देतांना आंम्हाला आनंद होत आहे. छोटे आणि मध्यम आकाराचे व्यवसाय, स्टार्ट अप्स, हस्तकलाकार आणि महिला व्यावसायिकांनी त्यांच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनां संपूर्ण भारतातील ग्राहकांसमोर सादर केले. या सणासूदीच्या दिवसात प्राईम सदस्यांची नोंदणी अधिक प्रमाणात केल्याचा विशेषकरुन टिअर२ आणि ३ शहरांतील ग्राहकांशी जोडणी केल्याचा आंम्हाला आनंद वाटतो, ग्राहक हे ऑनलाईन शॉपिंग करता ॲमझॉनला प्राधान्य देतात याचे हे द्योतक आहे. या वर्षी ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल मध्ये आमच्या ग्राहकांनी ‘ॲमेझॉन से लिया’ हे घोषवाक्य म्हणत आहेत.” असे ॲमेझॉन इंडिया चे कंट्री मॅनेजर मनीष तिवारी यांनी सांगितले.
