प्रा. डॉ. जे एफ पाटील यांचेअर्थशास्त्रतील भरीव योगदान हे सबंध महाराष्ट्रात परिचित आहे. त्यांचे शैक्षणिक शेत्रातील कार्य अतुलनीय आहे. त्यांनी शिवाजी विध्यापीठामध्ये प्राध्यापक, विभाग प्रमुख, संचालक बीसीयुडी व महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे सदस्य अश्या अनेक क्षमतेमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे.त्यांनीआर्थिक,सामाजिक, शिक्षणविषयकअशा अनेक विषयावर विपुल लेखन केले आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विध्यार्थीनी संशोधन कार्य केले आहे व ते आज आपापल्या क्षेत्रात चांगले कार्य करत आहेत. त्यांच्या बहुमोल योगदानाची स्मृती चिरंतन राहावी यासाठी शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक असोशीयशन (अर्थशास्त्र परिषद) यांनी शिवाजी विध्यापिठास त्यांच्या नावे पुरस्कार सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. शिवाजी विध्यापिठाच्या व्यवस्थापन परिषदेनेतोमान्य केला आहे. सदरील पुरस्कार दोन वर्षातून एकदा दिला जाणार आहे.सदरीलपुरस्काराचे स्वरूप हे रोख रुपये ५१०००/- मानपत्र, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे आहे. वर्ष २०२३ चा प्रथम पुरस्कार हा विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष प्रा डॉ. सुखदेव थोरात यांना जाहीर झाला आहे. प्रा. सुखदेव थोरात हे विख्यात अर्थतज्ञ असून अनेक केंद्रीय संस्थाचे ते प्रमुख राहिलेले आहेत.वर्ष २००८ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सम्मानित केले आहे.तेदेश विदेशातील अनेक विद्यापीठाचे मानद प्राध्यापक म्हणूनसद्या कार्यरत आहेत. अनेक विद्यापिठाकडून त्यांना डी. लिट. यानामांकित पदवीने सम्मानित केले आहे. सदरील पुरस्कार प्रदान समारंभ शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्रा. दिगंबर शिर्के यांच्या शुभ हस्ते दिनांक ३१ मार्च २०२३ रोजी दुपारी ४.३० वाजता शिवाजी विध्यापिठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्येसंपन्न होणार आहे.
