कोल्हापूर : आरबीएल बँकेने त्यांच्या सीएसआर उपक्रम – उमीद १००० अंतर्गत कोल्हापुरातील गरजु मुलींना १०१ सायकली वाटप महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण मंत्री मा श्री चंद्रकांतदादा पाटील याच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी मा. संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर आणि आरबीएल बँकेचे वरिष्ठ प्रतिनिधी. जिल्हा परिषद कोल्हापूर, नागाळा पार्क येथे सायकली स्वीकारण्यासाठी जमलेल्या मुलींनी मोठा उत्साह दाखवला.
मुले शाळा सोडण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे अंतर. या उपक्रमामुळे शिक्षणात प्रवेश वाढवण्यासाठी वाहतुकीची अत्यंत आवश्यक साधने उपलब्ध होतील. सायकली मुलींना अशा प्रकारे शाळेत जाण्यास मदत करतील जी ऊर्जा-कार्यक्षम आणि पर्यावरण पूरक असेल. बँक कोल्हापूर, चेन्नई, हैदराबाद, रायपूर, सिलीगुडी, गुवाहाटी, कोलकाता आणि गोवा यासह संपूर्ण भारतात १००० हून अधिक सायकली आणि स्कूल-किट्सचे वितरण करत आहे.
या उपक्रमावर भाष्य करताना, आरबीएल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आर सुब्रमण्यकुमार म्हणाले की , “आमच्या ‘कम्युनिटी अॅज द कॉज’ या ध्येयासाठी आम्ही आमच्या विविध सीएसआर उपक्रमा अंतर्गत कार्यक्रमांद्वारे उपेक्षित समुदायांना मदत करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत. जगभरात, शिक्षण ही मुलींच्या उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे. शिक्षणाची सोय करून, तरुण मुलींना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यापासून रोखणारे अडथळे आम्ही दूर करू शकतो.”
