कागलमध्ये वास्तुशांतीनिमित्त ग्रामदैवत श्री. लक्ष्मी देवी मंदिराच्या कलशारोहनानिमित्त कलशांची मिरवणूक
कागल, दि. १२: कागलमध्ये श्री. लक्ष्मी देवी मंदिराच्या कलशांच्या दिंडीमध्ये आमदार हसन मुश्रीफ रंगून गेले. हजारो माता-भगिनी डोकीवर आंबील- घुगऱ्यांच्या घागरी घेऊन या दिंडीमध्ये सहभागी झाल्या होत्या. आमदार श्री. मुश्रीफ यांनीही गळ्यात वीणा घेत हरी नामाचा गजर केला.
याबाबत अधिक माहिती अशी, बुधवार दि. १४ मंदिराची वास्तुशांती होत आहे. त्यानिमित्त मंदिरावर प्रतिष्ठापना करावयाच्या कलशांची दिंडीने मिरवणूक काढण्यात आली होती. आमदार श्री. हसन मुश्रीफ यांच्या निधीतून मंदिराच्या भक्त निवासासह प्रदक्षिणामंडप, दगडी पायऱ्या व परिसर सुशोभीकरण हे काम पूर्ण झालेले आहे.
आमदार श्री. हसन मुश्रीफ यांनी केले मिरवणुकीतील कलशांचे पूजन झाले. आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, कागल ही राजर्षी शाहू महाराजांची सर्वधर्मसमभावाची भूमी आहे.
