कोल्हापूर:ता.२०.कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) च्या वतीने गुरुवार दि.२०/०७/२०२३ इ.रोजी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावारसो यांना लम्पी आजाराने बाधित जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असलेने प्रतिबंधात्मक उपयायोजना करणेसंदर्भात संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.
१. या आजाराचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही परिणामी जनावरे दगावण्याचे प्रमाण जास्त आहे.तथपि शासनामार्फत देणेत येणारी शासकीय आर्थिक मदत तात्काळ दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळावी २. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त,मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व तालुक्यातील बी.डी.ओ व तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांची गोकुळ व जिल्ह्यातील इतर दूध संघाचे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या सोबत लम्पी आजार उपायोजने संदर्भात मिटिंग घेण्यात यावी.
या मागण्याचे निवेदन देण्यात आले व यासर्व विषयासह लम्पी आजारा संदर्भातील विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच मा.जिल्हाधिकारीसो यांनी लम्पी आजार रोखण्यासाठी विविध उपाययोजना गाव पातळीवर राबविण्या संबधी. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व तालुक्यातील बी.डी.ओ व तालुका पशुवैद्यकीय अधिकारी ग्रामपंचायत, पोलीस पाटील यांना सूचना देण्यात आले असल्याचे सागितले.तसेच लम्पी बाधित मृत जनावर पुरण्याकरिता मारलेल्या खड्यास १५०० रुपये अनुदान शासनामार्फत देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले.
संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या कार्यक्षेत्रात संकरीत गायी, देशी गायी व बैलांना गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून जास्त प्रमाणात लम्पी या आजाराचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. व हा आजार हा आजार गाय वर्गीय जनावरांना मोठ्याप्रमाणात होत असुन म्हैशीना हा आजार होण्याचे प्रमाण अल्प आहे.ज्या जनावरांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, अशा जनावरांना या आजाराची लागण जास्त प्रमाणात होते. बाधित जनावरांच्या औषध उपचाराला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे जनावरांना दिसणाऱ्या लक्षणानुसार औषधोपचार करावा लागतो. हा आजार आपल्या जनावरांना होऊ नये यासाठी लम्पी त्वच्यारोगाचे लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. म्हणजे लसीकरण केलल्या जनावरांचा या आजारापासून बचाव होतो.
लम्पीआजारात घ्यावयाची काळजी -जनावरांचा गोठा व परिसरामध्ये माशा,डास,गोचिड चिलटे, यांचा बंदोबस्त करण्यासाठी संघाकडे उपलब्ध असलेले कोर्सोलीन टि एच व गोचीड गो हे जंतुनाशक औषधे फवारावे.बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी बांधवीत.बाधित जनावरांचा चारा,पाण्याची भांडी शिल्लक राहिलेले पशुखाद्य हे निरोगी जनावरांसाठी वापरू नये.रोगाचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणाहून जनावरांची खरेदी विक्री करू नये.बाधित जनावरे दगावल्यास गावाच्या बाहेर उघड्यावर टाकू नयेत कारण या आजाराचा फैलाव माशा व डासांपासून होत असल्यामुळे दुस-या जनावरांना याची लागण होऊ शकते.बाधित जनावरांचे दूध वापरताना उकळून घेण्यात यावे.असे आवाहन संघामार्फत प्राथमिक दूध संस्थाना चेअरमन अरुण डोंगळे यांच्या मार्फत करण्यात आले .
यावेळी गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, माजी चेअरमन व जेष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक शशिकांत पाटील,बाळासाहेब खाडे, बयाजी शेळके, संघाचे पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.यु.व्ही.मोगले, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश साळुखे, डॉ.प्रकाश दळवी उपस्थित होते.
