कागल, दि. २५:कागलमध्ये वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वितरण कार्यक्रम झाला. यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी सौ. सुनीता नेर्लेकर, तहसीलदार जितेंद्र इंगळे, कोल्हापूर जिल्हा रेशन धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र मोरे आदी प्रमुख उपस्थित होते.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, महाराष्ट्र राज्य सरकारने गणेशोत्सव आणि दिवाळी या सणांसाठी महाराष्ट्रातील सर्वच रेशनकार्ड धारकांसाठी हा आनंदाचा शिधा देण्याचे धोरण घेतले आहे.
स्वागत व प्रास्ताविकपर भाषणात कोल्हापूर जिल्हा रेशन धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र मोरे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच रेशन धान्य दुकानदार गेले दहा दिवस महाराष्ट्र राज्य सरकारचा हा आनंदाचा शिधा शेवटच्या रेशनकार्ड धारकापर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र काम करीत आहेत.
यावेळी कागल तालुका रेशन धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष संदीप लाटकर, सचिव सातापा शेणवी, उपाध्यक्ष पुंडलिक कुदळे, संचालक नामदेव सावडकर, रावसाहेब पाटील, गणेश घाटगे, सतीश पसारे, जितेंद्र प्रभावळकर, गणेश सोनुले, एस. व्ही. पाटील व रेशन कार्ड धारक उपस्थित होते
