कोल्हापूर : भारतामध्ये उत्पादन क्षेत्रात घडून येत असलेल्या नवक्रांतीच्या, वृद्धीमधील क्षमतांचे लाभ गुंतवणूकदारांना घेता यावेत यासाठी, देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या फंड कंपन्यांपैकी एक, ऍक्सिस म्युच्युअल फंडने ऍक्सिस इंडिया मॅन्युफॅक्चरिंग फंड सुरु करत असल्याची घोषणा केली आहे. ऍक्सिस म्युच्युअल फंडची ही सर्वात नवी योजना ओपन-एन्डेड इक्विटी स्कीम असून इंडिया मॅन्युफॅक्चरिंग स्कीमचे प्रतिनिधित्व करते आणि तिचा बेंचमार्क निफ्टी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग टीआरआय आहे. एनएफओ १ डिसेंबर २०२३ पासून १५ डिसेंबर २०२३ पर्यंत खुली राहील.
भारतीय अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक बदलांचा फायदा करून घेण्यासाठी सज्ज असलेल्या थीम्समध्ये धोरणात्मक गुंतवणूक करण्याचे ऍक्सिस इंडिया मॅन्युफॅक्चरिंग फंडचे उद्दिष्ट आहे. भारताच्या उत्पादन क्षमतांची रुंदी आणि खोली ज्यामधून दिसून येईल असा वैविध्यपूर्ण दृष्टिकोन हा फंड मिळवून देऊ इच्छितो. यामध्ये भांडवली वस्तूंपासून ग्राहकोपयोगी टिकाऊ उत्पादनांपर्यंत आणि कापड उद्योगक्षेत्रापासून औषध निर्मितीपर्यंत अनेक विविध उद्योगक्षेत्रांचा समावेश असेल. त्यामुळे गुंतवणूकदारांना भारताच्या उत्पादन क्षेत्राच्या यशोगाथेमध्ये सहभागी होण्यासाठी एक सर्वसमावेशक मार्ग उपलब्ध करवून दिला जाईल.
भारतीय अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक, वापर, निव्वळ निर्यात या तीन विभागांवर हा फंड लक्ष केंद्रित केला आहे. फंडमध्ये बॉटम-अप दृष्टिकोन वापरला जाईल, ज्यामध्ये मल्टी-कॅप स्टॉक सिलेक्शन धोरण असेल. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सक्रिय वाटप आणि गुंतवणुकीच्या ‘क्वालिटी’ शैलीचा अवलंब करण्याबरोबरीनेच, ऍक्सिस इंडिया मॅन्युफॅक्चरिंग फंड भारतीय लिस्टेड बाजारपेठांमधील ज्या विभागांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही त्यांच्यावर भर देईल. भारताच्या उत्पादन क्षेत्रात असलेल्या आशादायक संधींचा लाभ गुंतवणूकदारांना घेता यावा यासाठी ऍक्सिस इंडिया मॅन्युफॅक्चरिंग फंड तयार करण्यात आला आहे.
ऍक्सिस एएमसीचे एमडी आणि सीईओ श्री. बी गोप कुमार यांनी सांगितले, “मेक इन इंडिया सारखे धोरणात्मक उपक्रम आणि अनेक वेगवेगळ्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याच्या सध्याच्या अतिशय महत्वपूर्ण काळात ऍक्सिस इंडिया मॅन्युफॅक्चरिंग फंड सुरु करण्यात येत आहे. हा थेमॅटिक फंड, भारताच्या वाढत्या गतीचे लाभ घेण्यासाठी तयार करण्यात आला आहे, भारताची औद्योगिक रूपरेषा पुनःपरिभाषित करण्याची क्षमता ज्यामध्ये आहे अशा क्षेत्रांवर हा फंड लक्ष केंद्रित करेल. ऍक्सिस इंडिया मॅन्युफॅक्चरिंग फंडसोबत भविष्याचा स्वीकार करण्यासाठी आम्ही गुंतवणूकदारांना आमंत्रित करत आहोत, हा फंड भारताच्या उत्पादन महत्त्वाकांक्षांबरोबरीने विकसित होण्यासाठी तयार केला आहे.”
