कोल्हापूर: वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लि. आपल्या उत्पादन श्रेणीमध्ये डब्ल्यूओएल हे नवे एनर्जी ड्रिंक समाविष्ट करत आहे. या नाविन्यपूर्ण उत्पादनामुळे प्रीमियम उत्पादन श्रेणीतील कंपनीचे स्थान मजबूत झाले आहे. या उत्पादनासाठी कंपनीने टेनिस प्रीमियर लीग, सीझन ५ बरोबर सहकार्य केले असून या धोरणात्मक भागिदारीच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांच्या मनात ठसा उमटवण्यासाठी उत्सुक आहे.
वॉर्डविझार्ड फुड्स हे नव्याने लाँच करण्यात आलेले उत्पादन डब्ल्यूओएल एनर्जी ड्रिंक गुणवत्तेचा मापदंड असून ट्रेंडसेटिंग आणि महत्त्वाकांक्षी तरुणाईसाठी तयार करण्यात आले आहे. यामध्ये टेनिस प्रीमियर लीगसाठी हजेरी लावणाऱ्या क्रीडाप्रेमींना आकर्षक चव, असामान्य दर्जा देऊन भुरळ घालते.
याविषयी वॉर्डविझार्ड फुड्सच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालिका शीतल भालेराव म्हणाल्या, आमच्या कंपनी अंतर्गत येणाऱ्या डब्ल्यूओएल एनर्जी ड्रिंक उत्पादन सादर करताना आनंद होत आहे.टेनिस प्रीमियर लीगबरोबर करण्यात आलेली भागिदारी आमच्या इच्छित ग्राहकवर्गासाठी दर्जेदार उत्पादने देण्यासाठी बांधिलकी दर्शवणारी आहे. या भागिदारीच्या पलीकडे जात डब्ल्यूओएल एनर्जी ड्रिंकच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण भविष्य तयार करण्याचे आणि वेगवेगळ्या प्रदेशांत आमची बाजारपेठ विकसित करण्याचे ध्येय आहे.