कोल्हापूर: वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लि. (डब्ल्यूडब्ल्यूएफएनबी) कंपनीला फुड सेफ्टी सिस्टीम सर्टिफिकेशन २२००० चे (एफएसएससी २२०००) यशस्वी पालन केल्याचे जाहीर करताना अभिमान वाटत आहे. एफएसएससी २२००० हा जागतिक स्तरावरील प्रचलित मापदंड असून ते खाद्यपदार्थांचा सर्वोच्च दर्जा व सुरक्षेचे प्रतीक मानले जाते.
हे प्रमाणपत्र सर्व आकारच्या कंपन्या आणि खाद्य साखळीतील गुंतागुंतीसाठी लागू होते व ते मिळणे हे डब्ल्यूडब्ल्यूएफएनबी चे कामकाज आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे असल्याच्या दिशेने टाकलेले लक्षणीय पाऊल आहे. खाद्य सुरक्षा व्यवस्थापन यंत्रणेनुसार फ्रोझन पदार्थ (शिजवून/तळून आणि आयक्यूएफ फ्रीजिंग) लॅमिनेट्समध्ये उत्पादन आणि पॅकिंग आणि आरटीई उत्पादने (शिजवणे आणि तापवून गाळणे) रिटॉर्ट पाऊचमध्ये डब्ल्यूडब्ल्यूएफएनबीला फूड सेफ्टी सिस्टीम सर्टिफिकेशन २२००० सह (एफएसएससी २२०००) सुसंगत आहे.
एफएसएससी २२००० सर्टिफिकेशन जागतिक मान्यतेसाठी प्रसिद्ध असून त्यामुळे डब्ल्यूडब्ल्यूएफएनबीला खाद्य सुरक्षा व्यवस्थापन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय मापदंड पार करणे शक्य होणार आहे. ही कामगिरी कंपनीची आपल्या उत्पादनांसाठी सर्वोच्च दर्जा, सचोटी आणि सुरक्षेप्रती असलेली बांधिलकी दर्शवणारी आहे.
वॉर्डविझार्ड फूड्स अँड बेव्हरेजेस लि च्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सौ. शीतल भालेराव म्हणाल्या, एफएसएससी २२००० प्रमाणपत्र जगभरातील ग्राहकांना उच्च जागतिक दर्जाचे खाद्यपदार्थ पुरवण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. हे प्रमाणपत्र आमच्या कामकाजाचा दर्जा, सुरक्षा आणि नियमपालनावर आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेले शिक्कामोर्तब असून त्यामुळे आमची गुणवत्ताही दिसून आली आहे. आम्हाला खात्री आहे, की जगभरातील ग्राहकांना सेवा देण्यासाठी हे प्रमाणपत्र लक्षणीय ठरेल.
डब्ल्यूडब्ल्यूएफएनबीसाठी एफएसएससी २२००० प्रमाणपत्र हा महत्त्वाचा टप्पा आहेच, शिवाय जागतिक पातळीवरील ग्राहक, भागीदार आणि भागधारकांचा विश्वास कायम राखण्यासाठी केलेली ही धोरणात्मक गुंतवणूक आहे. या प्रमाणपत्रामुळे डब्ल्यूडब्ल्यूएफएनबीला आंतरराष्ट्रीय कामकाजात खाद्य सुरक्षा व दर्जाचे सर्वोच्च पालन करणाऱ्या आघाडीच्या कंपनीचे स्थान मिळाले आहे.