कोल्हापूर, २२ ऑगस्ट २०२४ : ब्रँड कम्युनिकेशन विभागाचे नेतृत्व आणखी बळकट करण्यासाठी वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडने कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सच्या प्रमुखपदी श्री. दीपक नांबियार यांची नियुक्ती जाहीर केली आहे. दोन दशकांची दैदिप्यमान कारकीर्द लाभलेले श्री. नांबियार कंपनीच्या कम्युनिकेशन धोरणांचे नेतृत्व करणार असून त्याद्वारे ब्रँडचे अस्तित्व विस्तारण्याचे तसेच खाद्यपदार्थ आणि पेय क्षेत्रातील भागधारकांशी प्रभावी संवाद साधण्याचे ध्येय आहे.
श्री. नांबियार यांनी आपल्या करियरमध्ये इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपर समूहात विक्री आणि विपणन विभागाच्या प्रमुखपदी काम केले असून तिथे त्यांच्या कम्युनिकेशन, पब्लिक रिलेशन्स आणि मार्केटिंग कौशल्यांना झळाळी मिळाली. इलेक्ट्रॉनिक मीडियापासून सुरू झालेल्या करियरमध्ये त्यांनी आतापर्यंत पारंपरिक व डिजिटल कम्युनिकेशन चॅनेल्सचे सर्वसमावेशक ज्ञान मिळवले आहे. आधुनिक मीडियाच्या जगात विस्तार करण्यासाठी त्यांच्याकडे आवश्यक अनुभव आणि ज्ञान आहे.
कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सचे प्रमुख या नात्याने श्री. नांबियार कंपनीचे कम्युनिकेशन उंचावण्यावर, ब्रँडची दृश्यमानता वाढवण्यावर, सर्व प्लॅटफॉर्म्सवर सुसंगत आणि प्रभावी संदेश देण्यावर तसेच प्रमुख भागधारकांसह असलेले नाते बळकट करण्यावर भर देणार आहेत. त्यांचे कौशल्य आणि धोरणात्मक दृष्टीकोन कंपनीची कॉर्पोरेट प्रतिष्ठा उंचावण्यात तसेच विकास उपक्रमांना पाठिंबा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.
नांबियार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शीतल भालेराव म्हणाल्या, ‘दीपक नांबियार यांचे आमच्या नेतृत्वगटात स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. धोरणात्मक मार्केटिंग आणि कम्युनिकेशन्स क्षेत्रातील त्यांचा अनुभव तसेच त्यांचा नाविन्यपूर्ण दृष्टीकोन आमच्या भावी धोरणांशी सुसंगत आहे. त्यांच्या कौशल्यांच्या मदतीने प्रभावी कम्युनिकेशन धोरणांद्वारे आमचा ब्रँड सर्व भागधारकांसह बळकट नाते प्रस्थापित करेल आणि आमचे ग्राहक व भागधारकांमध्ये ब्रँडला जास्त चांगली दृश्यमानता, व्याप्ती आणि रिकॉल मिळेल असा विश्वास वाटतो.’
वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख दीपक नांबियार आपल्या नियुक्तीविषयी म्हणाले, ‘ वॉर्डविझार्ड समूहात रूजू होणे माझ्यासाठी सन्माननीय आहे. वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडच्या कम्युनिकेशन विभागाची जबाबदारी सोपवल्याने मी भारावून गेलो आहे. मी नेतृत्व गटाचा विशेषतः श्रीमती शीतल भालेराव यांचे ही संधी दिल्याबद्दल आभारी आहे. हे नाते वरच्या पातळीवर नेण्याचे आणि भागधारकांसह सखोल नाते प्रस्थापित करण्याचे माझे ध्येय आहे.’
वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेड कॉर्पोरेट कम्युनिकेशनमध्ये नवीन आणि प्रगतीशील विचारसरणी रूजवण्यासाठी बांधील आहे. श्री. नांबियार यांच्या नियुक्तीमुळे कंपनीची सर्व विभागांत गुणवत्ता साधण्याची बांधिलकी अधोरेखित झाली आहे. कंपनी बाजारपेठेत आपला विस्तार करत असतानाच श्री. नांबियार यांचे नेतृत्व ग्राहक, गुंतवणूकदार आणि भागधारकांना सुसंगत वाटेल अशाप्रकारचा संवाद साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.