कोल्हापूर , २१ ऑगस्ट २०२४ : आजचा क्षण स्कोडा ऑटो इंडियासाठी महत्त्वाचा टप्पा आहे, जेथे कंपनी आपल्या नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्हीसह भारतातील नवीन युगाच्या दिशेने वाटचाल करत आहे. फेब्रुवारीमध्ये घोषणा आणि नुकतेच डिझाइनचे टीझर सादर केल्यानंतर वेईकलना कल्पनात्मक देशव्यापी मोहिमेच्या माध्यमातून नाव देण्यात आले आहे. हजारो व्यक्तींच्या आवडीला सादर करणाऱ्या स्कोडा ऑटो इंडियाच्या नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे नाव असणार आहे कायलॅक, जी तिच्या भावी ड्रायव्हर्ससोबत अद्वितीय कनेक्शनची प्रतीक आहे.
नावाच्या अनावरणाप्रसंगी मत व्यक्त करत स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक पीटर जनेबा म्हणाले, ”आमची नवीन एसयूव्ही कायलॅक भारतातील नागरिकांसाठी आहे. ते देशातील आमच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या लाँचच्या प्रत्येक टप्प्याचा भाग असण्याची आमची इच्छा होती. ‘नेम युअर स्कोडा’ मोहिमेचा सहभागी आणि संभाव्य ग्राहकांमध्ये अभिमान व आपलेपणाची भावना जागृत करण्याचा मनसुबा होता. २००,००० हून अधिक प्रवेशिकांसह प्रतिसाद अत्यंत उत्स्फूर्त आहे. यामधून भारतातील आमचा वारसा अधिक दृढ होतो आणि लोकांमध्ये ब्रँड स्कोडाप्रती असलेली खास आवड दिसून येते. कारची नामकरण प्रक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आणि आगामी नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्या व सर्वात मोठ्या सेगमेंटमधील अल्टिमेट टप्प्याला सादर करते. कायलॅक सह व्यक्ती, ग्राहक व चाहत्यांनी स्वत:हून आमच्या नवीन फॅमिली मेम्बरला नाव दिले आहे, जेथे ही नवीन एसयूव्ही भारत व युरोपमधील टीम्सनी संयुक्तपणे विकसित केली आहे आणि स्थानिक पातळीवर उत्पादित केली जाईल.”
लोकांकडून नाव देण्यात आले
फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘नेम युअर स्कोडा’ मोहिमेन स्कोडाचे वापरकर्ते, ग्राहक आणि चाहत्यांना नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्हीसाठी नाव देण्याकरिता सक्षम केले, जी भारतात व जगभरात २०२५ मध्ये लाँच करण्यात येणार आहे. ‘नेम युअर स्कोडा’ मोहिमेच्या माध्यमातून सहभागींनी कॉम्पॅक्ट एसयूव्हीसाठी नाव सुचवले, जे स्कोडाच्या त्यांच्या आयसीई एसयूव्हींना नाव देण्याच्या परंपरेशी बांधील राहत एक किंवा दोन शब्दांसह ‘के’ अक्षरापासून सुरू होत ‘क्यू’ अक्षरावर शेवट होते. या मोहिमेला २४,००० हून अधिक अद्वितीय नावांसह २००,००० हून अधिक प्रवेशिका मिळाल्या.
पुढील टप्प्यामध्ये, सहभागींनी १५ शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या नावांमधून त्यांच्या आवडीच्या नावासाठी मत दिले. मिळालेल्या मतांच्या आकडेवारीनुसार १५ शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या नावांमधून स्कोडा ऑटो इंडियाने १० नावांची घोषणा केली. या यादीमधून सर्वाधिक मते मिळालेल्या आणि सर्व कायदेशीर अनुपालन निकषांची पूर्तता केलेल्या विजेत्या नावाची नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्हीसाठी निवड करण्यात आली. कायलॅक हे नाव क्रिस्टलसाठी संस्कृत शब्दामधून आले आहे, ज्यामधून वेईकलची मूळ वैशिष्ट्ये दिसून येतात आणि माउंट कैलाश मधून प्रेरित आहे.