कोल्हापूर: केएडब्ल्यू वेलोचे मोटर्स प्रा. लि.चा (केव्हीएमपीएल) उपक्रम असलेल्या मोटोहॉसचे अधिकृत उद्घाटन झाले आहे. भारतातील ऑटोमोटिव्ह रिटेल क्षेत्रात नवा अध्याय सुरू करण्याचा मोटोहॉसचा मानस आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राहक-केंद्रित सेवा यांची सांगड मोटोहॉसने घातली असून इलेक्ट्रिक आणि इंटरनल कॉम्बशन इंजिन (आयसीई) असलेल्या मोटारसायकलींची वैविध्यपूर्ण श्रेणी मोटोहॉसमध्ये पाहायला मिळणार आहे.
प्रसिद्ध ब्रँड्स व्हीएलएफ आणि ब्रिक्स्टन मोटरसायकल्ससह मोटोहॉने पदार्पण केले आहे. या ब्रँड्सच्या जागतिक दर्जाच्या उत्कृष्ट निर्मितीचे अनुभव आता भारतीय रायडर्सना मिळणार आहेत.
केव्हीएमपीएलच्या कोल्हापूरमधील अत्याधुनिक कारखान्यातून मोटोहॉसचे कामकाज चालते. या कारखान्याची वार्षिक उत्पादन क्षमता 20,000 युनिट्स आहे. 300हून अधिक कुशल तज्ञांची टीम निर्मिती आणि असेंब्ली प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी कार्यरत आहे.
लॉन्चच्या निमित्ताने आपले विचार व्यक्त करताना, केव्हीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक श्री. तुषार शेळके म्हणाले, “मोटोहॉस भारतातील दुचाकी वाहनांच्या भविष्याचा आरसाच आहे. आमच्या आयसीई आणि ईव्ही मोटरसायकल्सच्या विस्तृत श्रेणीत पारंपरिक तंत्रज्ञान आणि नवकल्पनांची सांगड घालण्यात आली आहे. यामुळे आम्ही देशभरातील बाइकप्रेमींना एक अतुलनीय प्रवास अनुभव प्रदान करत आहोत. आम्हाला आनंद आहे की भारताला मोटरसायकलिंगच्या एका नवीन युगात घेऊन जाण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.”
“व्हीएलएफमध्ये आम्ही आमच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या लॉन्चसह शहरी वाहतुकीमध्ये अमूलाग्र बदल घडविण्यास सज्ज आहोत. भारत ही एक वेगाने वाढणारी आणि बदलणारी बाजारपेठ आहे, आणि या अद्वितीय देशात शाश्वत वाहतुकीची आमची कल्पना साकार करण्याचा आम्हाला अभिमान आहे. हे फक्त वाहन नसून, अधिक शाश्वत, कार्यक्षम आणि कनेक्टेड जीवनशैलीच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. नवकल्पना आणि ग्राहकांच्या गरजांचा प्रामुख्याने विचार करून डिझाइन केलेली स्टाइल, परफॉर्मन्स आणि पर्यावरणाप्रती असलेली जबाबदारी यांची परिपूर्ण सांगड घालून व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर तयार करण्यात आली आहे. रायडिंगचा अनुभव उंचावणाऱ्या नावीन्यपूर्ण उपाययोजना पुरविण्यासाठी मोटोहॉसशी आम्ही हातमिळवणी केली आहे. या भागीदारीमुळे शाश्वत आणि बदलत्या गरजांनुसार बदलणाऱ्या वाहतुकीचे भविष्य घडवण्यासाठी आम्हाला एकत्र काम करण्याची नवीन संधी मिळाली आहे,” असे व्हीएलएफचे मालक श्री. अलेस्सांद्रो टारटारिनी यांनी सांगितले.
मुंबई, पुणे, बंगळुरू, चेन्नई, जयपूर, अहमदाबाद आणि गोवा या शहरांसह श्रेणी 1 व श्रेणी 2 च्या शहरांमध्ये मोटोहॉसतर्फे प्रीमिअम रिटेल आउटलेट्स सुरू करण्यात येत आहेत. 2025 च्या मध्यापर्यंत 20 डीलरशीप सुरू करण्याचा या ब्रँडचा मानस आहे, जेणेकरून ग्राहकांना ठिकाणी सेवा उपलब्ध होऊ शकेल.
व्हीएलएफ मॉ इलेक्ट्रिक स्कूटर्स किंमत ₹ १,२९,९९९/- * पासून पुढे.
ब्रिक्स्टन मोटरसायकल्स
क्रॉसफायर 500एक्स आणि क्रॉसफायर 500एक्ससी ₹ ४,७४,१००/-* पासून पुढे.
क्रोमवेल 1200 : ₹ ७,८३,९९९/- * पासून पुढे
क्रोमवेल 1200एक्स (लिमिटेड एडिशन, 100 युनिट्स): ₹ ९१०६०० * पासून पुढे.