नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2026 : टोयोटा किर्लोस्कर मोटरने (टीकेएम) आज नवीन इनोव्हा हायक्रॉस लॉन्च करण्याची घोषणा केली. भारतातील ही पहिली फ्लेक्स हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकल असून, यामध्ये सेल्फ-चार्जिंग हायब्रिड टेक्नॉलॉजीची सुविधा आणि E20 ते E85 पर्यंतच्या सर्व इथेनॉल इंधन मिश्रणांचा वापर करण्याची सुविधा ग्राहकांना मिळणार आहे. यामुळे ग्राहकांना अधिक सुविधा आणि विश्वास मिळणार आहे. इनोव्हा हायक्रॉसच्या विश्वासार्हता आणि ब्रँडवरील विश्वासाची परंपरा पुढे नेत या नवीन मॉडेलमध्ये आकर्षक डिझाइन, प्रीमियम कम्फर्ट आणि अधिक सोयीस्कर फीचर्स देण्यात आले आहेत.
एफएफव्ही-एसएचईव्ही टेक्नॉलॉजीच्या समावेशामुळे नवीन इनोव्हा हायक्रॉस फ्लेक्स हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकलने टोयोटाच्या मल्टी-पाथवे दृष्टिकोनाला आणखी पुढे नेले आहे. यामध्ये इलेक्ट्रिफिकेशन आणि फ्लेक्सिबल फ्युएल क्षमता यांचा एकत्रित वापर करण्यात आला आहे. स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेले फ्लेक्स-फ्युएल इंजिन आणि ई-ड्राइव्ह टेक्नॉलॉजी यामुळे ही गाडी भारतासाठी उपयुक्त आणि शाश्वत मोबिलिटी सोल्यूशन्स विकसित करण्याच्या टोयोटाच्या प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. तसेच देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यास आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्दिष्टांना मदत करण्यासाठीही हे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरणार आहे.
या गाडीची भारत आणि जपानमधील टोयोटाच्या इंजिनिअरिंग टीमने देशभरात सविस्तर टेस्टिंग केली. या टेस्टिंगदरम्यान शहरातील रस्ते, महामार्ग, डोंगराळ भाग आणि खडबडीत रस्त्यांसह विविध भारतीय ड्रायव्हिंग परिस्थितींमध्ये गाडीची गुणवत्ता आणि कार्यक्षमता तपासण्यात आली. तसेच वेगवेगळ्या हवामान परिस्थितींमध्येही तिची चाचणी घेण्यात आली. गाडीची एकूण कार्यक्षमता, मजबुती आणि विश्वासार्हता तपासून ती टोयोटाच्या गुणवत्ता मानकांनुसार असल्याची खात्री करण्यात आली.
नवीन इनोव्हा हायक्रॉस फ्लेक्स हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकल सादर करताना टोयोटा किर्लोस्कर मोटरचे चेअरमन, मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर श्री. मासाकाझू योशिमुरा म्हणाले, “टोयोटामध्ये आमचा विश्वास आहे की ऊर्जा परिवर्तन आणि कार्बन न्यूट्रॅलिटीसाठी एकच उपाय पुरेसा नाही. विशेषतः भारतासारख्या विविध गरजा असलेल्या देशात मोबिलिटीच्या गरजाही वेगवेगळ्या आहेत. नवीन इनोव्हा हायक्रॉस फ्लेक्स हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकलच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध करून देत आहोत. यामध्ये इलेक्ट्रिफिकेशनसोबत E20 ते E85 पर्यंतच्या सर्व इथेनॉल इंधन मिश्रणांचा वापर करण्याची सुविधा देण्यात आली आहे. असे व्यावहारिक उपाय ग्राहक आणि समाजाच्या हितासाठी उपयुक्त ठरतील, तसेच भारताची ऊर्जा सुरक्षा आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्दिष्टांना पाठबळ देतील, असा आम्हाला विश्वास आहे.”





