पेरूचा रसाळ गोडवा आणि मिरचीचा तिखट झटका एकत्र आणणारा हा नवीन व्हेरियंट रोमानोव्हच्या पोर्टफोलिओमध्ये वैशिष्ट्यपूर्ण स्वादाची भर करतो.
महाराष्ट्र, १६ नोव्हेंबर २०२६: रोमानोव्ह व्होडका या इनब्रू बेव्हरेजेसच्या भारतातील सर्वाधिक पसंती मिळवणाऱ्या व्होडका ब्रँडने महाराष्ट्रात फिस्टी ग्वावा चिली फ्लेव्हर्ड व्होडका लाँच करून आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण फ्लेव्हर आणला आहे. पेरूच्या गोडव्याची सांगड मिरचीच्या ठसक्याशी घालणारा हा नवीन व्हेरियंट स्वादांचा अनोखा मेळ साधतो, ज्यामुळे रोमानोव्हच्या विस्तारत चाललेल्या फ्लेव्हर्ड व्होडका पोर्टफोलिओमध्ये वेगळा पर्याय जोडला गेला आहे.
हे लाँच बाजारपेठेत ताज्या आणि समकालीन उत्पादनांची भर घालून आजच्या ग्राहकांसाठी स्वादाचा अनुभव नव्याने परिभाषित करण्याबाबत रोमानोव्हची कटिबद्धता अधिक दृढ करते. आकर्षक गुलाबी रंगछटा आणि आधुनिक पॅकेजिंगसह फिस्टी ग्वावा चिली ब्रँडच्या फ्लेव्हर्ड व्होडका पोर्टफोलिओला वैशिष्ट्यपूर्ण दृश्य ओळख प्रदान करतो.
आपल्या ‘रेडी व्हेन यू आर’ तत्त्वज्ञानाशी बांधील राहत रोमानोव्ह सहजपणे आनंद घेता येईल अशा व्होडका अनुभवाला प्रोत्साहन देते, जो विविध प्रसंगांमध्ये आणि ग्राहकांच्या पसंतीशी सहज जुळवून घेतो. त्याची वैविध्यता आणि सहज मिसळण्याची क्षमता ग्राहकांसाठी सुलभ पर्याय ठरते, मग ती दैनंदिन मिक्सर्ससोबत सहज मिसळायची असो किंवा विविध कॉकटेल्ससाठी बेस म्हणून वापरायची असो.
या लाँचबाबत मत व्यक्त करत इनब्रू बेव्हरेजेसचे मार्केटिंगचे जनरल मॅनेजर श्री. सुमित तिवारी म्हणाले, “आमच्या व्हाईट स्पिरिट्स पोर्टफोलिओमध्ये नावीन्यतेला चालना देताना आम्ही ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडींवर आधारित फ्लेव्हर कॉम्बिनेशन्स सादर करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. पेरू आणि मिरची हे समीकरण भारतीय चवीसाठी जुन्या आठवणींना उजाळा देणारे कॉम्बिनेशन आहे, जे मिरचीच्या ठसक्यासह पेरूच्या गोडव्याचा आस्वाद घेण्याच्या परिचयाच्या आठवणी ताज्या करते. रोमानोव्ह फिस्टी ग्वावा चिली हेच लोकप्रिय फ्लेव्हर कॉम्बिनेशन घेऊन आले आहे आणि आमच्या फ्लेव्हर्ड व्होडका श्रेणीसाठी रंजक पर्याय तयार करते. या लाँचसह, आम्ही पोर्टफोलिओमध्ये आणखी एक वेगळे वैशिष्ट्य जोडत आहोत आणि भारतातील बाजारपेठेत रोमानोव्हचे स्थान अधिक दृढ करत आहोत.”





