कोल्हापूर /प्रतिनिधी
भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील हे दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आले होते.दरम्यान भाजपा जिल्हा कार्यालय बिंदू चौक येथे भाजपा पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांच्याशी नागरिकता संशोधन कायदा बाबत संवाद साधला.
यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील नागरिकता संशोधन कायदा अर्थात CAA यावर मार्गदर्शन करताना म्हणाले, विरोधक या कायद्याबाबत समाजामध्ये गौरसमज पसरवत आहेत. नागरिकता संशोधन कायदा हा कोणत्याही धर्माविरुद्ध नसून हा कायदा नागरिकत्व देण्यासाठी आहे कोणाचे नागरिकत्व काढून घेण्यासठी नाही. या कायद्याचे महत्व, व्यापकता, हा कायदा नेमका कोणत्या नागरिकांच्यासाठी आहे याचे स्पष्टीकरण सोप्या भाषेत लोकांच्या समोर मांडले पाहिजे. या कायद्याबाबतची माहिती सर्व सामान्य नागरिकांना होण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी माहितीपत्रकाच्या माध्यमातून समाज प्रबोधनासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत, घरोघरी संपर्क साधून, लोकांच्या मनातील शंका, गैरसमज दूर करून जनजागृती करावी असे आवाहन केले.
याप्रसंगी अक्षय निरोखेकर आणि विद्या म्हमाणे-पाटील यांनी या कायद्याबाबत मुंबई प्रदेश कार्यालयातील प्रशिक्षण वर्गामध्ये घेतलेली माहिती स्थानिक पदाधिकारी यांना सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी केले तर सरचिटणीस विजय जाधव यांनी आभार मानले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मेत्राणी, गटनेते विजय सूर्यवंशी, आर.डी.पाटील, अॅड.संपतराव पवार, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, अजित ठाणेकर, आशिष ढवळे, किरण नकाते, गीता गुरव, गणेश देसाई, संजय सावंत, माणिक पाटील, संतोष माळी, भरत काळे, प्रदीप पंडे, आशिष कपडेकर, डॉ.राजवर्धन, रविंद्र मुतगी, दिग्विजय कालेकर, सयाजी आळवेकर, संदीप कुंभार, उदय शेटके, अप्पा लाड, विशाल शिराळकर, विवेक वोरा, गिरीष साळोखे, विजय आगरवाल, सुनिता सूर्यवंशी, रजनी भुर्के, गायत्री राऊत, स्वाती कदम, आसावरी जुगदार, प्रमोदिनी हर्डीकर, सुलभा मुजुमदार, कविता पाटील, प्राची कुलकर्णी, मंगला निप्पाणीकर, नजीर देसाई, किशोर लाड, राहूल पाटील, संजय साने, प्रसाद मोहिते, यशवंत कांबळे, तानाजी रणवरे, सुनीलसिंह चव्हाण, महादेव बिरंजे आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
