केंद्र सरकारच्या विविध योजनांचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त उत्पादनावर भर द्यावा भीमा कृषी प्रदर्शनात खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र...
१३ ते १६ फेब्रुवारी चार दिवस मेरी वेदर मैदान येथे प्रदर्शन आयोजित
चार दिवस चालणाऱ्या प्रदर्शनात शेतीविषयक नामांकित कंपन्यांचा सहभाग, शेतकऱ्यांनी प्रदर्शनास...
पहिल्या पर्वाला लहान मुलांकडून भरभरून मिळालेल्या प्रतिसादानंतर, ड्रोवी पुन्हा सज्ज आहे चिमुकल्यांच्या पसंतीस पडलेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे दुसरे पर्व म्हणजेच सीझन २ घेऊन येण्यासाठी....
मराठी झी ५ तर्फे 13 फेब्रुवारी रोजी रेणुका शहाणे आणि अभिनय बेर्डे अभिनीत ‘उत्तर’ घरोघरी पोहोचणार: आई-लेकामधील हळुवार नात्याचे बंध प्रेक्षकांच्या भेटीला
...
जास्त व्हेरिएंट्स, अधिक पर्याय आणि अतुलनीय मूल्याद्वारे संपूर्ण श्रेणीत वैशिष्ट्ये सर्वांसाठी उपलब्ध
कायलक आता चार ते सहा व्हेरिएंट्समध्ये, एकूण ११ वेगवेगळ्या किमतींमध्ये उपलब्ध
नवीन क्लासिक प्लस...
महाराष्ट्र: भारतातील आयोडाइज्ड मीठ विभागात 1983 पासून अग्रणी आणि बाजारातील आघाडीचा ब्रँड असलेल्या टाटा सॉल्टतर्फे 'हर नारंगी पॅक टाटा नमक नही होता' हा ठाम...
कोल्हापूर, भारत | 2 फेब्रुवारी 2026 - फेडरल बँकेच्या सीएसआर शाखा असलेल्या फेडरल बँक हॉरमिस मेमोरियल फाउंडेशन अंतर्गत चालवली जाणारी प्रमुख कौशल्य विकास योजना...
मुंबई, १ फेब्रुवारी २०२६ :भारतीय अर्थव्यवस्था येत्या दोन-तीन वर्षांत जगातील तिसरी मोठी अर्थसत्ता बनू शकते आणि त्यासाठी अनुकूल संधी उपलब्ध आहेत. ब्रिटन, न्यूझिलंड, संयुक्त...
Opdag de bedste strategier for at vinde stort i casinoer med Unknown
Forstå grundlæggende casino strategier
For at vinde stort i casinospil, er det vigtigt at...
Afsløring af hemmelighederne bag succesfulde spilstrategier hos Unknown casino
Forstå grundlæggende spiltyper
Det er vigtigt at forstå de forskellige spiltyper, der tilbydes på casino, for at...
भाजप युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचेआज रविवारी १ मार्च रोजी कोल्हापुरात आगमन होत आहे. यानिमित्त त्यांचे करवीर नगरीत दुचाकी रॅलीने जल्लोषी स्वागत करण्याचा निर्धार आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी केला आहे. या संबंधी खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये २ हजार दुचाकी स्वारांची रॅली काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र कृष्णराज महाडिक हे गेल्या पाच वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांची ओळख दूरवर पसरली आहे. यापुर्वी त्यांनी फॉर्म्युला थ्री या आंतरराष्ट्रीय कार रेसिंगमध्ये उज्वल कामगिरी करत देश-विदेशातील लाखो नागरिकांची मने जिंकली आहेत. सर्वच क्षेत्रात खर्या अर्थाने युथ आयकॉन ठरलेल्या कृष्णराज महाडिक यांचा योग्य सन्मान करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीवेळी सांगितले होते. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कृष्णराज महाडिक यांची युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष पदी निवड केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह सर्वच प्रमुख नेत्यांनी कृष्णराज महाडिक यांचा योग्य सन्मान ठेवत, त्यांना युवा मोर्चाचं प्रदेशाध्यक्षपद दिलं. या निवडीनंतर राज्यभरातील नागरिकांकडून कृष्णराज महाडिक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. तसेच राज्यभरातील पक्ष कार्यकर्ते, युवा वर्गात उत्साहाचं वातावरण आहे. युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचे रविवार १ मार्च रोजी मुंबईहून कोल्हापुरात आगमन होत आहे. त्यांचे जल्लोषी स्वागत करण्याच्या दृष्टीने आज भाजपा कार्यालयात खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. कृष्णराज महाडिक यांची युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी निवड होणे हा सर्वस्वी पक्षाचा निर्णय आहे. पक्षाने त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी ते आपल्या कार्यक्षमतेने योग्य पध्दतीने पार पाडतील, तसेच पक्षाची भूमिका पटवून देणे आणि विस्तार करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे. कोल्हापूरच्या परंपरेला साजेल असेच त्यांचे स्वागत व्हावे, अशी अपेक्षा देखील खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली. बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी स्वागत रॅलीसंबंधी माहिती दिली. दुपारी ४ वाजता छत्रपती ताराराणी चौकातून कृष्णराज महाडिक यांच्या स्वागत रॅलीला सुरूवात होणार आहे. या रॅलीत २ हजार पेक्षा अधिक दुचाकी स्वारांचा समावेश आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात विसर्जित होईल. त्यानंतर सायंकाळी ६ ते ८ या वेळेत कृष्णराज महाडिक पक्ष कार्यालयात शुभेच्छा स्वीकारणार आहेत. या कार्यक्रमात जनतेने उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केले आहे. कृष्णराज महाडिक यांची निवड हा संपूर्ण कोल्हापूरचा सन्मान असल्याचेही विजय जाधव यांनी सांगितले. दरम्यान कोल्हापूर महापालिकेत स्वीकृत नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य तसंच विविध समित्यांवर निवड झालेल्यांचा सत्कार खासदार महाडिक यांच्या हस्ते झाला. यामध्ये विजय जाधव, सुनील वाडकर, हेमंत आराध्ये, आप्पा लाड, प्रा. जयंत पाटील, प्रशांत मोरे, प्रसाद जाधव, तानाजी पाटील यांचा समावेश होता. यावेळी जिल्हा परिषद राजवर्धन नाईक-निंबाळकर, नाथाजी पाटील, गटनेते मुरलीधर जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
Как быстро зарегистрироваться на Pinco Казино ЗеркалоЗарегистрироваться на Pinco Казино Зеркало - это довольно простой процесс, который включает в себя несколько шагов. Данная статья...
Recent Comments