मुंबई : भारतातील आघाडीचा बिस्किट ब्रँड ब्रिटानिया न्यूट्रीचॉईस आता अभिनेता आमिर खान यांच्यासोबत नवी जाहिरात मोहीम सुरू करत आहे. “एक चांगला निर्णय पुढचे निर्णय सोपे करतो” हा या मोहिमेचा मुख्य संदेश आहे. रोजच्या आयुष्यातील छोट्या निवडी आपला दिवस सकारात्मक बनवतात, ही कल्पना आमिर खान त्यांच्या खास विनोदी शैलीत मांडताना दिसतात.
या मोहिमेसोबत कंपनीने 100% मिलेट्स सफरचंद-दालचिनी चवीच्या कुकीज सादर केल्या आहेत. या कुकीज ज्वारी, राळे आणि नाचणीसारख्या धान्यांपासून बनवल्या असून त्यात मैदा नाही, अतिरिक्त साखर नाही आणि पाम तेल नाही. १०० ग्रॅम पॅकची किंमत ₹५५ असून हे उत्पादन सर्व प्रमुख शहरांतील आधुनिक स्टोअर्स आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
ब्रिटानिया इंडस्ट्रीजचे मार्केटिंग प्रमुख सिद्धार्थ गुप्ता म्हणाले की, छोटा चांगला निर्णय पुढील निवडी सहज करतो, ही कल्पना आमिर खान यांनी प्रभावीपणे जिवंत केली आहे.
लोव लिंटासद्वारे साकारलेल्या या जाहिरातीत दैनंदिन आयुष्यातील साधे प्रसंग दाखवत चांगल्या निवडींचे महत्त्व मांडण्यात आले आहे.
आमिर खान म्हणाले की, “एक चांगली निवड तुमचा संपूर्ण दिवस बदलू शकते,” आणि म्हणूनच या मोहिमेचा भाग बनणे आनंददायक आहे.
बदलत्या स्नॅकिंग सवयी लक्षात घेऊन, ग्राहकांना अधिक आरोग्यदायी आणि सोपे पर्याय देण्याकडे न्यूट्रीचॉईसचा भर राहणार आहे.
ब्रिटानिया न्यूट्रीचॉईस आणि आमिर खानची नवी मोहीम
RELATED ARTICLES







