कोल्हापूर/प्रतिनिधी :कोल्हापूर येथील प्रायव्हेट हायस्कूलचे विद्यार्थी कुमारी स्नेहा नागेश हंकारे इयत्ता आठवी व भाऊ सोहन नागेश हंकारे इयत्ता चौथी या विद्यार्थ्यांनी लॉक डाऊनच्या काळामध्ये निसर्गचित्रे तयार केलि.या त्यांच्या निसर्गचित्रांची प्रदर्शन छत्रपती शाहू स्मारक भवन आर्ट गॅलरी दसरा चौक कोल्हापूर येथे रविवार दिनांक २४जानेवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता गृहराज्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व कोल्हापूर आर्ट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतेज ऊर्फ बंटी डी पाटील व मान्यवर यांच्या शुभ हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होत आहे.एकूण सात दिवस हे प्रदर्शन ही विक्री व्यवस्था केली जाणार आहे या प्रदर्शनामध्ये या शालेय विद्यार्थ्यांनी लॉक डाऊन काळामध्ये मध्ये जलरंग व अॅक्रॅलिक रंगांत निसर्गचित्रे बनवलि आहेत या भावंडांनी सत्तर चित्रे या प्रदर्शनात मांडणार असून या चित्रांची विक्रीही केली जाणार आहे या विक्रीतून मिळणाऱ्या पैशांमध्ये वंचित घटकातील विद्यार्थ्यांना कोविड लस खरेदी करून मदत केली जाणार आहे.या उपक्रमासाठी त्याचे आई वडील चित्रकार नागेश हंकारे व त्यांचे शिक्षक प्रशांत जाधव सर व प्राचार्य अजय दळवी व कोल्हापूर आर्ट फौंडेशन परिवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे .