एखाद्या विशिष्ट परिस्थितीचे चित्रीकरण करताना आणि विशेषतः प्रेमाचे चित्रण करताना संगीताची भूमिका महत्त्वाची असते. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर एक नवीन मालिका सुरू होत आहे, क्यों उत्थे दिल छोड आए.1947 च्या काळातील ही अमृत, वशमा आणि राधा या तीन तरुणींची प्रेम कहाणी आहे. विभाजनपूर्व काळात ही गोष्ट सुरू होते आणि स्वातंत्र्य उंबरठ्यावर असतात त्या तिघींची स्वप्नं, आशाआकांक्षा आणि त्यांना गवसलेलं प्रेम यांचं चित्रण या मालिकेत असणार आहे. ही गोष्ट अविभाज्य भारतातील लाहोरमध्ये सुरू होईल. त्याकाळी लोकांचे जीवन कसे होते याचे चित्रण आपल्याला पाहता येईल. या मालिकेसाठी लाहोरचा सेट उभारण्यात येत आहे.
या मालिकेत संगीताची भूमिका मोठी असेल. गदर एक प्रेम कथा या चित्रपटासाठी संगीत देणारे प्रसिद्ध संगीतकार उत्तम सिंह पुन्हा एकदा या मालिकेसाठी आपली जादू पसरतील. प्रेम भावनेने भरलेले आणखी एक गाणे देण्यास उत्तम सिंह सज्ज आहेत, आणि हे गाणे जणू आपल्या देशाचेच प्रेम गीत बनेल. बेला शेंडे आणि जावेद अली यांच्या आवाजात हे गीत असेल. जावेद अली पुन्हा एकदा एक सुंदर रोमॅंटिक गीत देण्यास सज्ज आहे आणि या गाण्याच्या माध्यमातून देश पुन्हा एकदा प्रेमात पडेल. संगीत क्षेत्रातील लोकप्रिय आवाज बेला शेंडे आपल्या सुमधुर कंठाने ही गीत म्हणणार आहे. हे दोन्ही आवाज देशाचे लाडके आहेत, आणि दोघे मिळून ते संपूर्ण वातावरण अधिकच रोमॅंटिक करून टाकतील.
उत्तम सिंह म्हणाले, “जेव्हा मला या मालिकेसाठी संगीत देण्याचा प्रस्ताव देण्यात आला, तेव्हा मला खूप आनंद झाला आणि जेव्हा मला हे समजले की, ही 1940 च्या दशकातील गोष्ट असेल, तेव्हा तर मला आकाशच ठेंगणे झाले. तीन तरुणींच्या प्रेमकहाणीसाठी स्वातंत्र्यपूर्व काळाची पार्श्वभूमी असणार आहे. एक संस्मरणीय आणि सगळ्यांना गुणगुणता येईल असे गाणे करण्यासाठी मी सरसावलो. जेव्हा मी ही चाल बांधली, तेव्हा दोनच नावे मला सुचली, ती म्हणजे, बेला शेंडे आणि जावेद अली, कारण या दोघांचे आवाज या गाण्यासाठी अगदी अनुरूप आहेत. त्यांच्या आवाजातील मधुरतेमुळे या गाण्याचा भाव अधिकच गहिरा झाला आहे.
आपली उत्सुकता व्यक्त करत बेला शेंडे म्हणाली, “मी हे गाणे म्हणायचे स्वीकारले, कारण माझा प्रेमात दृढ विश्वास आहे आणि मला प्रेमकहाण्या खूप आवडतात. जावेद अली आणि उत्तम जी यांच्यासोबत पुन्हा काम करायचे आहे, हे समजल्यावर तर मी खूपच आनंदले. यापूर्वी त्यांच्यासोबत काम करण्याचा माझा अनुभव खूप छान आहे. हे दोघे जण संगीत क्षेत्रातील आदरणीय आणि अत्यंत प्रतिभावान व्यक्ती आहेत. त्यांच्यासोबत काम करायला मिळणे हा माझा सन्मान आहे. मालिकेचे कथानक मला जेव्हा थोडक्यात सांगण्यात आले, तेव्हाच मी या गाण्याला आवाज देण्याचे नक्की केले. प्रेक्षक हे गाणे केव्हा ऐकतात आणि काय प्रतिक्रिया देतात हे पाहण्यास मी खूप उत्सुक आहे.”
जावेद अली म्हणाला, “पुन्हा एकदा सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनसोबत भागीदारी करताना मला आनंद होत आहे. ही आपल्या घरी परत आल्यासारखी भावना आहे. संगीतकार उत्तम सिंह आणि गायिका बेला शेंडे यांच्यासोबत काम करण्याच्या कल्पनेने मला धन्यता वाटते आहे. मी तिची गाणी ऐकली आहेत आणि ती एक अप्रतिम गायिका आहे. तिच्यासोबत गाण्याचा अनुभव मस्त होता. या मालिकेतील तीन तरुणींचे चित्रण आणि अलगद उलगडत जाणारी त्यांची प्रेम कथा समजल्यावर मी हे गाणे गाण्याचे स्वीकारले.