कोल्हापूर/प्रतिनिधी : राष्ट्रीय बँका बंद पाडुन गोरगरीब जनतेला खाजगी सावकारांच्या ताब्यात देण्याचे कटकारस्थान मायक्रो फायनान्स कंपनीच्या विळख्यात चार कोटी महिला अडकल्या आसुन लांखो संसार उद्वस्त झाले आहेत पंधरा हजार महिलांनी आत्महत्या केली आहे.
ह्या मायक्रो फायनान्स मुळच्या कुठल्या, यांचे रिजर्व बँकेत प्रतेकी पन्नास हजार कोटी ठेवी ठेऊन घेणारे कोन,मायक्रोफायन्नास भारतात आले कसे,कोनी आणल, राष्ट्रीयकृत अनेक बँका बंद का पाडल्या, आत्महत्या केलेल्या महिलांना न्याय कोन देणार?मायक्रोफायन्नास दुसर इंग्रज सरकार आहे का महिलांना कटकारस्थान कोन आडकवतय,आशा अनेक प्रश्नानांना जाब विचारण्यासाठी१७ फेब्रुवारी रोजी कोल्हापूरमध्ये राज्य व्यापी महामोर्चा काढण्यात येणार आहे.
गेली १५ वर्षे कोणत्याही राजकीय पक्षात न जाता किंवा कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा न देणारे स्वाभिमानी संघटना म्हणजे बहुजन परिवर्तन पार्टी प्र महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती (नोंदणीकृत) यांच्यावतीने हा मोर्चा काढला जाणार आहे.
